शालेय पोषण आहार कर्मचारी यांना पाच हजार रुपये वेतन मिळण्यासाठी पाठपुरावा करणार - आमदार आशुतोष काळे - Shramik News

Breaking

Thursday, October 10, 2024

शालेय पोषण आहार कर्मचारी यांना पाच हजार रुपये वेतन मिळण्यासाठी पाठपुरावा करणार - आमदार आशुतोष काळे


 

  पोषण आहार योजनेमध्ये काम करत असलेले कर्मचारी अतिशय तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. राज्य सरकारने अनेक वेळा आश्वासन देऊन देखील या कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवलेले. नाही किमान वेतन कायद्याप्रमाणे सुद्धा देखील त्यांना मानधन दिले जात नाही.सध्या त्यांना फक्त 2500 रुपये एवढेच मानधन दिले जाते. त्या बदल्यात भरमसाठ अशी कामे या कर्मचाऱ्यांचा करून घेतली जात आहेत. तरी आपणास नम्र विनंती आहे की या कर्मचाऱ्यांना किमान दरमहा पाच हजार रुपये मानधन मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे कोपरगाव चे आमदार आशुतोष काळे यांनी  सम्यक फौंडेशन प्रणित श्रमिक मजदूर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना कोपरगाव  यांच्या शिष्टमंडळाला दिले.  . या प्रसंगी आशुतोष काळे  यांनी या कर्मचार्यांच्या विविध समस्या समजून घेतल्या..यावेळी शिष्टमंडळात  जिल्हा अध्यक्षा  सविता विधाते,जिल्हा सरचिटणीस विद्या अभंग,तालुका अध्यक्ष  प्रकाश पानपाटील  तालुका सचिव मोनाली ठाणगे तालुका उपाध्यक्ष सोनाली ,संघटक शीला दळवी,समीत शेख ,सोनाली उगले ,निलोफर शेख,रीना  आदिसह अनेक पदाधिकारी व शालेय पोषण आहार  कर्मचारी उपस्थित होते. 

Pages