श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 14 जानेवारी 2025
कोपरगाव - मकर संक्रांत हा नविन वर्षातला पहिला सण आहे.हा सण महिलांसाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच तो लहान मुले,तरुणाई आणि जेष्ठ यांच्यासाठी सुध्दा महत्त्वाचा आहे.मकर संक्रांतीला लहान मुले,तरुण हे डी जे च्या तालावर पतंग उडविण्याचा आनंद घेतात.भारतभर हा उत्साह असतो. कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती सुनिल देवकर यांनी देखील आज कोपरगाव शहरात यांनी आपल्या सवंगड्यासह घेतला.कोपरगाव शहरातील तेरा बंगले परिसरात सुनिल देवकर यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी ताज्या करत पतंग उडविण्याचा आनंद घेतला आहे.