श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 13 जानेवारी 2025
कोपरगाव तालुक्यातील रवंदे गावात नुकतेच सात दिवसांचे श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव यांचे रवंदे गावात राष्ट्रीय सेवायोजना अंतर्गत श्रमसंस्कार हिवाळी शिबिर घेण्यात आले. शिबिराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष एस. एस.जी.एम. कॉलेजचे उपप्राचार्य डॉक्टर सांगळे, प्रमुख पाहुणे महेंद्र कुमार काले, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सरपंच शोभाताई भवर, उपसरपंच ऋषिकेश कदम, सर्जेराव कदम मुख्याध्यापक प्रभाकर कदम, भीमराव भुसे माजी जिल्हा परिषद सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. सात दिवसापासून सुरू असलेल्या श्रमसंस्कार शिबिरात 92 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. गावातील स्मशानभूमी ग्रामपंचायत परिसर रस्ते मंदिरे या ठिकाणांची स्वच्छता केली. झाडे लावली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील परिसरातील कचरा क्रीडांगण स्वच्छता केली. मुले शाळेतच निवासी होती तिथेच स्वयंपाक करून राहत होती. समारोपप्रसंगी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा हे मूल्य रुजवावे कोणतेही काम करण्याची लाज नसावी, भविष्य उज्वल बनवायचे असेल तर त्याला कष्टाची जोड हवी असे मत समारोपप्रसंगी उप प्राचार्य डॉक्टर सांगळे यांनी व्यक्त केले हा कॅम्प घेऊ गावाची स्वच्छता केली सर्व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक उपसरपंच ऋषिकेश कदम यांनी केले. यावेळी महेंद्र कुमार काले, प्रभाकर कदम भीमराव भुसे यांनी आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमात स्वादिष्ट भोजनाची सोय करण्यात आली होती. यावेळी प्रतिभा रांधवणे डीबीए तराळ प्रवीण आहेर भाऊसाहेब घोटेकर सोमनाथ मंडाळकर एकनाथ लामखडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी सवई तर आभार सर्जेराव कदम यांनी मानले.