साई ग्रुपच्या वतीने वृक्ष संवर्धन - Shramik News

Breaking

Tuesday, January 14, 2025

साई ग्रुपच्या वतीने वृक्ष संवर्धन


 श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 14 जानेवारी 2025

आज अमेरिकेची नव्हे तर जगाची चिंता वाढवणारी घटना घडत आहे . अमेरिकेतील लॉन्स एंजलिस वाइल्ड फायर रोखण्यासाठी जग प्रयत्न करत  आहे हजारो लोक विस्थापित होताना दिसत आहेत प्राणी ,पक्षी या आगीत भस्मसात होत असल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर या पर्यावरणाची चिंता स्पष्ट जाणवत असताना साई शिक्षक ग्रुप निसर्गाचं जतन करण्याचा वसा पुढे नेण्याचे काम करत असताना दिसतोय खूप मोठं पर्यावरण वाचवण्यात काम साई ग्रुप करतोय लोकांसाठी एक आदर्श निर्माण करण्याचे काम करत आहे . आज मकर संक्रांतीच्या निमित्त पूर्ण भारतभर संक्रांतीच्या सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे तिळगुळ घ्या गोड गोड बोला याप्रमाणे पतंग उत्सव ही जोरात आहे पण नायलॉन धागा आज ही बाजारात असल्याने या धाग्यापासून अनेक लोकांचे गळे कापले जात आहेत . अनेक प्राणी आपले प्राण देताना आपण पाहत असतो तसेच सर्वात जास्त कष्ट आणि त्रास पक्षांना होत आहे त्यांच्या नाजूक पंखांना तुटताना पाहताना वाईट वाटते पण साई शिक्षक ग्रुपने या पाखरांना प्राण्यांना विसावा निर्माण करण्याचा जणू वसा  घेतलाय आज मकर संक्रांति निमित्त साई ग्रुपचे सदस्य श्री विलासजी पुंडलिक महिरे  यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला पर्यावरण वाचवण्यासाठी साई ग्रुपचा चाललेला प्रयत्न पाहून सर्वांनी कौतुक केले या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला साई ग्रुपचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते अहिल्यानगर प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक  शशिकांत जेजुरकर ज्ञानेश्वर वाकचौरे, शरद शिंदे गोकुळ वाघ  हिम्मतराव महाले आशिष पारडे ,अनिलराव इंगळे  , प्रविण कोल्हे  योगेश मोरे , गणेश कहांडळ  , भैरवनाथ बारहाते , सचीनकडू , बाळासाहेब पाचपिंड यश महिरे , बाळ गोपाळ ,वाढदिवसाला व वृक्षारोपणासाठी उपस्थित होते

Pages