गोधेगाव येथील रखडलेला हाडोळ रस्ता विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रयत्नातून अखेर सुरू – भाऊसाहेब वाकचौरे - Shramik News

Breaking

Sunday, June 8, 2025

गोधेगाव येथील रखडलेला हाडोळ रस्ता विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रयत्नातून अखेर सुरू – भाऊसाहेब वाकचौरे


 

गोधेगाव (ता. कोपरगाव) –

गोधेगाव येथील मागील वीस वर्षांपासून रखडलेला हाडोळ रस्ता अखेर सुरु करण्यात आला असून यामागे कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांचे मोलाचे प्रयत्न आहेत. या रस्त्याचा उपयोग प्रामुख्याने गोरगरीब शेतकरी व मागासवर्गीय समाजबांधवांना शेतीसाठी ये-जा करण्यासाठी होत असून, रस्ता बंद असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.या समस्येने सर्व त्रस्त झालेले होते मात्र आता काम मार्गी लागल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण झाले आहे अशी प्रतिक्रिया प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली आहे.


गोधेगाव येथील भाऊसाहेब वाकचौरे, राजेंद्र हुसळे, नामदेव वाकचौरे महाराज, विष्णू हुसळे, चांगदेव हुसळे, प्रल्हाद दुशिंग, रामभाऊ वाकचौरे, रामदास गोरे, लक्ष्मण वाकचौरे, पवन सोळशे, भाऊसाहेब शिरसाट, भिमराज हुसळे, कैलास हुसळे, राहुल लालवाणी, सुभाष कानडे व रवींद्र रांधवणे या शेतकऱ्यांनी सातत्याने विवेकभैय्या कोल्हे यांच्याकडे रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा केला.


या मागणीची दखल घेत विवेकभैय्या कोल्हे यांनी वरिष्ठ प्रशासन पातळीवर सातत्याने पाठपुरावा करत रस्ता खुला करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश येत, अखेर अत्यंत आवश्यक असलेला हा रस्ता सुरु करण्यात आला.


या कामात कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत, मंडल अधिकारी अनिल मांढरे व तलाठी सय्यद मॅडम यांनी प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका घेत, शिस्तबद्ध पद्धतीने काम पार पाडले. मंडल अधिकारी व तलाठी यांनी प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित राहून उशिरापर्यंत रस्त्याचे काम पूर्णत्वास नेले. या रस्त्यामुळे स्थानिक नागरिक व शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असून, त्यांनी विवेकभैय्या कोल्हे यांचे आभार मानले आहेत.

Pages