कोपरगाव - राज्याचे लक्ष लागून असलेल्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघात क्षणाक्षणाला राजकीय घडामोडी घडत आहे. विवेक कोल्हे यांच्या भूमिकेने कोपरगाव विधानसभा मतदारसंघासह राज्य देखील संभ्रम अवस्थेत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने कोपरगावचा निर्णय राखून ठेवल्याचे बोलले जात होते. परंतु अधिक वाट न बघता लवकरात लवकर निर्णय व्हावा ही आघाडीतील प्रमुख नेत्यांची मागणी असल्यामुळे कोपरगाव विधानसभेची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला जाण्याची शक्यता आहे. जर ही जागा उबाठाला गेलीस तर जनतेचा प्रतिनिधी म्हणून माजी नगराध्यक्ष राहिलेले आणि शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक राजेंद्र झावरे यांना उबाठा गटाची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता आहे. राजेंद्र झावरे यांच्या रूपाने सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी विधानसभेत जाईल अशी मतदारसंघात जोरदार चर्चा आहे. महायुती सरकारवर मतदार संघ नाराज असून कोल्हे कुटुंब निवडणुकीत नाही याचा फायदा राजेंद्र झावरे यांच्या मशालीला होऊ शकतो. शिवाय शिंदेंच्या शिवसेनेचे नितीन औताडे हे विद्यमान आमदारांच्या विरोधात बंडाच्या तयारीत असल्याचे समजते. या बंडाचा ही फायदा राजेंद्र झावरे यांना होऊ शकतो. एकंदरीत ही निवडणूक विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना म्हणावी तेवढी सोपी राहणार नाही. कदाचित काळे कोल्हे यांच्या शिवाय तिसराच आमदार कोपरगाव विधानसभा मतदार संघाला मिळू शकतो अशीही जोरदार चर्चा मतदारसंघात होत आहे.
Tuesday, October 22, 2024

Home
Ahmednagar
kopargaon
news
rajy
अखेर कोपरगाव विधानसभा मतदारसंघात मशाल पेटली, महाविकास आघाडीकडून राजेंद्र झावरे संभाव्य उमेदवार

Tags
# Ahmednagar
# kopargaon
# news
# rajy
Share This
About Shramik
rajy
Tags
Ahmednagar,
kopargaon,
news,
rajy