लाडक्या बहिण योजनेचा पहिला झटका, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना अद्याप वेतन नाही - Shramik News

Breaking

Thursday, October 17, 2024

लाडक्या बहिण योजनेचा पहिला झटका, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना अद्याप वेतन नाही


 कोपरगाव प्रतिनिधी -   संपूर्ण देशामध्ये शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत हे कर्मचारी सर्वात कमी मानधनावर काम करत आहे. लाडक्या बहीण योजनेमुळे शालेय पोषण आहार कर्मचारी यांना अद्याप मागील महिन्याचे  वेतन मिळालेली नाही.  वेतन हे एक ते पाच तारखेच्या आत करण्याचे बंधनकारक असताना देखील चालू महिन्याचे वेतन अद्याप या कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही.लाडक्या बहीण योजनेमुळे या कर्मचाऱ्याच्या वेतनासाठी राज्यात कोणत्याच जिल्ह्याला अनुदान मिळाले नसल्याची माहिती मिळत आहे. इतर कर्मचाऱ्यांना देखील दिवाळी सण अग्रिम मिळाला नाही.कदाचित पगार वेळेवर देखील होतो की नाही याची भीती सुद्धा या राज्य कर्मचाऱ्यांना वाटत आहे. एकंदरीत लाडक्या बहीण योजनेमुळे राज्य कर्मचारी यांना त्रास व्हायला सुरुवात झाली असे जाणवत असल्याची भावना कर्मचारी यांनी व्यक्त करत आहे.

Pages