रिपब्लिकन युवा सेनेचे जाहीर प्रवेश व पदनियुक्ती कार्यक्रम संपन्न - Shramik News

Breaking

Wednesday, October 2, 2024

रिपब्लिकन युवा सेनेचे जाहीर प्रवेश व पदनियुक्ती कार्यक्रम संपन्न

 



श्रीरामपूर / प्रतिनिधी:

रिपब्लिकन युवा सेनेचे पद नियुक्ती व जाहीर प्रवेशाचे कार्यक्रम नुकतेच संपन्न झाले. श्रीरामपूर येथील शासकीय विश्राम गृह येथे सर सेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आशीर्वादाने व रिपब्लिकन युवा सेना प्रदेश अध्यक्ष किरण घोंगडे यांच्या सुचनेवरून रिपब्लिकन सेनेत कार्यकर्त्याचे जाहीर प्रवेश व पद नियुक्ती कार्यक्रम नुकतेच अहमदनगर युवा अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष इम्रानभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाले.

सदर कार्यक्रमा दरम्यान मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमा प्रसंगी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष इम्रानभाई पटेल, जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांची भाषणे झाली तसेच युवा सेनेचे जिल्हा महासचिव अमोल मकासरे,राहुरी तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब दिवे, वांबोरी शहराध्यक्ष भांबळ  यांची भाषणे झाली.

सदर कार्यक्रमाच्या वेळी उत्तर अहमदनगर जिल्हा युवा उपाध्यक्षपदी शोएब खान, श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष पदी रवींद्र गायकवाड,श्रीरामपूर तालुका संघटक पदी एकलहरे येथील नसीर जहागीरदार ,शहर सचिव पदी बंडू लुटे, शहर संघटक पदी आयाज मिर्झा यांची नियुक्ती करण्यात आली. 

यावेळीअसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संकलन

समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११

Pages