वजीर शेख/ पाथर्डी
आजच्या काळात युवती व महिलांवरील वाढत चाललेले अन्याय अत्याचार हा सर्वात मोठ्ठा चिंतेचा विषय असुन अन्यायमुक्त महीला सक्षमीकरण करण्यासाठी अन्याय अत्याचार सहन करणारे जास्त दोषी असुन अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्याचा संकल्प युवती - महीलांनी करून अन्याय अत्याचार निर्मुलन समितीत सहभागी व्हावे असे प्रतिपादन रविंद्रदादा जाधव यांनी बैठकीत केले. रुग्ठा माॅल अंबड या ठिकाणी समितीच्या शहर सचिव मंजुषाताई जगताप यांचे अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी मार्गदर्शक म्हणून रविंद्रदादा जाधव उपस्थित होते. या प्रसंगी महीला सक्षमीकरण, रोजगांर स्वयंरोजगार, आरोग्याविषयी चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी फिजिओ थेरपिस्ट भारती पाटील यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना प्राचीन प्राकृतिक थेरपीवर आधारित लाईफगेन फ्री थेरपी चे प्रात्यक्षिक करून दाखवले.