“मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी दाऊद इब्राहिमची भेट घेतली होती”; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा; म्हणाले, “दुबई विमानतळावर…” - Shramik News

Breaking

Friday, October 18, 2024

“मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी दाऊद इब्राहिमची भेट घेतली होती”; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा; म्हणाले, “दुबई विमानतळावर…”


मुंबई प्रतिनिधी -  मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी दुबई विमानतळावर दाऊद इब्राहिमची भेट घेतली होती, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच या भेटीदरम्यान दाऊदने शरद पवार यांना सोन्याचा हार दिला, असेही ते म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्यानंतर आता खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. यावरून आता पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

“१९८८ ते १९९१ दरम्यान शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते, या काळात शरद पवार लंडनला गेले होते. तिथून कॅलिफोर्नियाला गेले, तिथे २ दिवस थांबले. कॅलिफोर्नियात त्यांनी एक बैठक घेतली. तिथून शरद पवार लंडनला परत आले. तिथून दोन दिवसांनी ते दुबईला गेले. दुबई एअरपोर्टवर त्यांची दाऊद इब्राहिमबरोबर भेट झाली, दाऊदने त्यांना सोन्याचा हार भेट दिला, तिथून शरद पवार पुन्हा लंडनला गेले आणि भारतात परतले”, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

Pages