
कोपरगाव प्रतिनिधी - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनकरवस्ती ब्राह्मणगाव येथे आज वार शुक्रवार रोजी बाल आनंद मेळावा साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व माजी सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले .विद्यार्थ्यांनी भाजीपाला स्टॉल, खाद्यपदार्थ स्टॉल ,तसेच मनोरंजक खेळ हे मांडण्यात आले होते. या विद्यार्थ्यांनी आपल्या घरून आपल्या शेतातील भाजीपाला विक्रीसाठी आणला होता . खाद्यपदार्थांमध्ये पाणीपुरी इडली सांबर, पॉपकॉर्न, धपाटे, मॅगी असे पदार्थ होते. विद्यार्थ्यांनी बाल आनंद मेळावा मध्ये सुमारे 2100 रुपये एवढी रक्कम मिळवली. या कार्यक्रमात विद्यार्थी सक्रिय सहभागी होते .तसेच श्री बाळासाहेब केकान शाळा व्यस्थापन समिती अध्यक्ष व शोभाताई बनकर माजी सरपंच तसेच बहुसंख्य प्रमाणात पालक उपस्थित होते . सुभाष येवले, सुकदेव मोरे ,अमर इनामके भागवत येवले, भारती बनकर पद्माबाई मोरे ,अश्विनी अहिरे ,प्रियंका बनकर,बाळासाहेब बनकर ,शांता अहिरे, रतिका अहिरे मुक्ताबाई पवार ,स्वाती मोरे अनिल जाधव ,शरद आसणे मंगल लोणारे ,शितल आसणे ,योगिता आसने लक्ष्मीबाई जाधव, मच्छिंद्र शिरसाट ,शरद पवार, सुखदेव बनकर ,शोभाताई सांगळे, प्रवीण सांगळे, तन्वी सांगळे,लता शिंगाडे , सुनिता इल्हे, हे सर्व पालक , माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वात जास्त पालकांचे लक्ष वेधून घेतले ते मनोरंजक खेळ व पॉपकॉर्न स्टॉल ने कमी खर्चात दोघांनी बालआनंद मेळाव्यात जास्त पैसे कमवले. तेजस बनकर या विद्यार्थ्याने शेपू, कोथिंबीर, मेथी जुड्या, टवटवीत असल्यामुळे लवकर विक्री झाल्या . विदयार्थ्यानी बाल आनंद मेळाव्यातून खरेदी विक्री नफा तोटा तसेच व्यवसाय कौशल्य विक्री करण्यासाठी लागणारे कौशल्य आत्मसात केले. तसेच मनमुराद आनंद घेतला. विद्यार्थ्यांच्या चेहरयावरचा आनंद ओसंडून वाहत होता. बाल आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर वाकचौरे शिक्षक वृंद महेंद्र निकम व मनीषा जाधव.सुनिता माळी व सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले