आ.आशुतोष काळे यांच्या पाठीशी कोपरगाव मतदार संघातील संपूर्ण तिळवण तेली समाज खंबीरपणे उभे राहणार - Shramik News

Breaking

Thursday, November 14, 2024

आ.आशुतोष काळे यांच्या पाठीशी कोपरगाव मतदार संघातील संपूर्ण तिळवण तेली समाज खंबीरपणे उभे राहणार


 कोळपेवाडी वार्ताहर :- तिळवण तेली समाजाच्या मागण्या घेवून ज्या ज्या वेळी गेलो त्या त्यावेळी कधीही रिकाम्या हाताने परत आलो नाही. कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या मंदिरासाठी आ.आशुतोष काळे यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे आपल्या अडचणी सोडविणारा व आपल्या भावनांची कदर करणाऱ्या आ.आशुतोष काळे यांच्या पाठीशी कोपरगाव मतदार संघातील संपूर्ण तिळवण तेली समाज खंबीरपणे उभे राहणार असल्याचे तिळवण तेली समाजाचे नेते व राष्ट्रवादी कॉंगेस पक्षाचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश गवळी यांनी म्हटले आहे.

कोपरगाव मतदार संघातील तिळवण तेली समाज बांधवांची बैठक नुकतीच कोपरगाव येथे आ. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी त्यांनी आ.आशुतोष काळे यांनी समाजासाठी केलेल्या भरीव सहकार्यातून उतराई होण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

ते पुढे म्हणाले की, कोपरगाव शहरासह मतदार संघात तिळवण तेली समाजाने सामाजिक, धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेले आहे. परंतु कोपरगाव तालुक्यात कुठेच श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचे मंदिर उभारलेले नव्हते व समाजाचे सभागृह देखील नव्हते. त्यामुळे मागील तीन दशकांपासून कुठेच श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांची जयंती कार्यक्रम व सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी कुठेच सांस्कृतिक भवन नव्हते.गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून पुण्यतिथी, जयंती, तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी देखील जागा नव्हती. त्यासाठी समाजाने आपापल्या परीने पुढाकार घेवून समाज बांधवांच्या सहकार्याने पाच वर्षापूर्वी जागा देखील खरेदी केली परंतु त्या ठिकाणी मंदिर आणि सभागृह कसे उभे करायचे असा प्रश्न समाज बांधवांना पडला होता.

      त्यावेळी सर्व तिळवण तेली समाज बांधवांनी एकत्र येत आ.आशुतोष काळे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मंदिर आणि सांस्कृतिक भवनाचा प्रश्न मांडला असता शंभर टक्के सहकार्य करण्याचे फक्त आश्वासनच दिले नाही तर तातडीने दहा लाख रुपये निधी देखील उपलब्ध करून दिला आणि अधिक निधीची गरज भासल्यास निधी देवू अशी ग्वाही देखील दिली त्यामुळे मागील अनेक दशकापासूनचे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचे मंदिर व सांस्कृतिक भवन बांधण्याचे समाज बांधवाचे स्वप्न सत्यात उतरण्यास सुरुवात होवून मंदिराचे व सांस्कृतिक भवन उभे राहिले आहे.त्यामुळे तिळवण तेली समाज बांधव यापूर्वीही आ.आशुतोष काळेंच्या सोबत होता व यापुढेही सोबत राहणार असल्याचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश गवळी यांनी सांगितले.

Pages