श्रमिक न्यूज सविता महेंद्र विधाते संपादिका
कोपरगाव - भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी एम्स रुग्णालयात निधन झाले.त्यांच्या निधनाने जगातील एक उत्कृष्ट अर्थतज्ञ हरपला आहे.भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात डॉक्टर मनमोहन सिंग यांचा मोलाचा वाटा आहे.समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याची त्यांची मानसिकता होती.सहकारी असो वा विरोधक सर्वंचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावर निर्णय घेण्याची त्यांची ही सवय सर्वानाच मोहित करणारी होती.त्यांच्या निधनाबद्दल सात दिवसांचा सरकारी दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.श्रमिक न्यूज परिवाराकडून भावपुर्ण श्रद्धांजली.