वाळु वहातुक करण्यासाठी शासकीय भूखंडावरील झाडे तोडून रस्ता केल्या बद्दल कारवाई होणे बाबत सामाजिक कार्यकर्ते नवनाथ वाघ यांनी दिला उपोषणाचा इशारा - Shramik News

Breaking

Saturday, December 21, 2024

वाळु वहातुक करण्यासाठी शासकीय भूखंडावरील झाडे तोडून रस्ता केल्या बद्दल कारवाई होणे बाबत सामाजिक कार्यकर्ते नवनाथ वाघ यांनी दिला उपोषणाचा इशारा


 

कोपरगाव तालुक्यात माहेगाव देशमुख येथील कुंभारी शिव येशील वाळु वहातुक करण्यासाठी ठेकेदाराने चक्क शासकीय भूखंडावरील झाडे तोडून आपली वाळु वहातुक सोईस्कर करण्यासाठी 200ते250 शासकीय भूखंडावरील झाडे तोडून रस्ता तयार केला आहे. सदर ठिकाणी दलीत कुटुंबातील लोक राहतात. हा ञास गरीब घरातील लोकांना होत आहे. सदर घटनेबाबत  वनविभागाने आज पावेतो कोणत्याही प्रकारचे कारवाई केली नाही किंवा रस्ता बंद केला नाही. हा ञास दलितांना होत असुन सदर रस्त्याने जोरात वाळुचे डंपर जात असल्याने तेथील स्थानिक पातळीवरील लोकांच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे. परंतु निवेदन देऊन सुद्धा शासन दरबारी कोणत्याही प्रकारचे कठोर कारवाई करण्यात आली नाही. म्हणून सामाजिक कार्यकर्ते नवनाथ वाघ यांच्या सह 30/12/2024 रोजी वनविभागाच्या शासकीय भूखंडावरील माहेगाव देशमुख कुंभारी शिव रस्ता येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत. वेळीच दखल घेऊन कारवाई अपेक्षित आहे असा इशारा आंदोलन कर्ते यांनी दिला आहे.

Pages