श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 5 जानेवारी 2025
कोपरगाव प्रतिनिधी - कोपरगाव तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752जी या रोड चे रुंदीकरण चालू आहे सदर ठिकाणी शेतकरी भुखंड धारक एन ए प्लांट धारक यांना विश्वास पुर्वक आधार न देता लोकप्रतिनिधी संमतीने सदर पुणतांबा चौफुली येथे उड्डाणपूल ऐवजी चक्क मृत्यू चा साफळा होईल अशी पद्धतीने रोडच्या मधोमध भिंती टाकुन बोगदा बांधण्यात आला आहे हा बोगदा म्हणजे पुर्व पश्चिम असा उभारला आहे सदर ठिकाणी चौफुली असल्याने दक्षिण उत्तर असा राष्ट्रीय महामार्ग चे कामकाज सुरू आहे सदर ठिकाणी लहान मोठे वहातुक जाताना विरुद्ध दिशेने अनेक दिवसांपासून दैनंदिन दिवसात अपघात होत आहेत सदर बोगदा ठिकाणी खड्डे चुकवत गाडी चालवावी लागत आहे परंतु या कडे या मतदारसंघात सक्षम लोकप्रतिनिधीत्व काळजी स्वरूप काम करण्यासाठी किंवा आदेश करण्यास सक्षम दिसुन आले नाही अनेक शेतकरी यांच्या शेतीतून रुंदीकरण चालू आहे परंतु कोणत्याही शेतकऱ्यांना आज पावेतो शासकीय नियमानुसार मोबादला मिळाला नाही असे असताना ठेकेदार सदर रुंदीकरणाचे काम करत आहेत अधिग्रहित करण्यास सुरुवात केली आहे जिथे तिथे दादागिरी हुकूमशाही ची भाषा ऐकवल्या जात आहे उपोषण ठिकाणी साधं लोकप्रतिनिधी यांनी चौकशी सुद्धा केली नाही उपोषण ठिकाणी पाहणी करण्यासाठी लोकप्रतिनिधी यांचे अनेक कार्यकर्ते हेलपाटे मारून पाहत होते परंतु उपोषण ठिकाणी काही एक समाधान केले नाही उपोषण ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग संगमनेर उप कार्यकारी अभियंता यांनी भेट दिली परंतु त्यांचे कडुन समजले की विधानसभा लोकप्रतिनिधी जे सांगतील त्या प्रमाणे आमचे हात बांधलेले आहे तुम्ही उपोषण ठिकाणी केलेली मागणी हि भारत सरकार केंद्र सरकार रस्ते विभाग यांच्या कडुन सोडून घ्या पाठपुरावा करून तुमची मागणी खरी आहे परंतु लोकप्रतिनिधी यांनी आजुबाजुला असणारे शेतकरी यांची संमती घेऊन पुढे काम करायला हवे होते परंतु मुक्याला बुक्यांचा मार हा सहन करून अन्याय सोसावा लागत आहे म्हणून आम्ही स्वतः आमरण उपोषणाला स्थगिती देऊन केंद्र सरकार रस्ते विभाग यांच्या कडुन लोकप्रतिनिधी यांचा सविस्तर जबाब नोंदवून कोणत्या शेतकऱ्यांनी पुणतांबा चौफुली, बेट नाका या ठिकाणी उड्डाणपूल देण्यात यावा असा जबाब नोंदवून पुढील उचित कारवाई अपेक्षित आहे न केल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन, आमरण उपोषणाची दक्षता राखुन ठेवत आहे म्हणून आम्ही पोलिस निरीक्षक भगवान मथुरे साहेब व मा तहसीलदार महेश सावंत साहेब निवासी नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांच्या मध्यस्थीने आमरण उपोषणाला स्थगिती दिली आहे,अशी माहिती उपोषण कर्ते शिवाजी कवडे यांनी दिली आहे.