श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 9 जानेवारी 2025
अकोले - आज दि.९/१/२०२५ रोजी जि. प .प्रा. शाळा, ठाकरवाडी (खानापूर) येथे श्री. नेताजी सुभाषचंद्र पतसंस्था, डोंगरगाव चे चेअरमन तसेच अकोले पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष श्री. सुरेशजी प्रकाश उगले यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना खाऊ वाटप व शाळेसाठी दोन सिलिंग फॅन भेट म्हणून दिले .याप्रसंगी गणोरे गावचे मा.श्री. राजेंद्रजी आंबरे तसेच देवठाण बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी मा. अनिलजी गायकवाड तसेच कुंभेफळ केंद्राचे केंद्रप्रमुख मा. श्री. बाळासाहेब आरोटे उपस्थित होते. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात श्री. सुरेशजी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला मिशन आपुलकी अंतर्गत शाळेला फॅन भेट दिल्याबद्दल शाळेने सर्वांचे आभार मानले.