श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 7फेब्रुवारी 2025
कोपरगांव - कोपरगांव विधानसभा मतदारसंघ यांची मागणी
कोपरगाव शहरातील नगरपालिका हद्दीतील अतिक्रमण काढण्या पुर्वी अतिक्रमण धारकांची पहीली समस्या समजून घेऊन निवारण करावे मगच अतिक्रमणाचा बडगा नगरपालिका प्रशासनाने करावा अतिक्रमण काढण्यासाठी घाई करतात पुनर्वसन करण्यासाठी वेळ लागतोय त्यातच पुनर्वसन करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे हा अन्याय कोपरगाव शहराला पाहण्यास मिळत आहे अगोदर गोर गरीब व्यवसायिक यांच्या समस्या समजून घेणे आवश्यक आहे त्यांना अतिक्रमण का काढायचं आहे ते पहीलं समजून सांगा त्यांचे प्रश्न पहीलं सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहा मगच पुढची कारवाई अपेक्षित आहे असं केलं नाहीतर कोपरगाव शहरातील अतिक्रमण धारकांसाठी वेगळाच पवित्रता करण्यात येईल यांची पहीली नोंद घ्यावी
नुसताच गोरं गरीबां वरील अन्याय सहन केला जाणार नाही
पहीलं अतिक्रमण धारकांची समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावा मगच कारवाई करावी अशी मागणी बळीराजा पार्टी चे अध्यक्ष शिवाजीराव कवडे पाटील कोपरगाव विधानसभा मतदारसंघ यांनी केली आहे