रवंदे शाळेची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न - Shramik News

Breaking

Sunday, February 16, 2025

रवंदे शाळेची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न


 श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 17 फेब्रुवारी 2025

रवंदे - पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रवंदे तालुका कोपरगाव शाळेची सहल शुक्रवार दिनांक १४फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ठीक ५ . ३० वाजता संभाजीनगर दर्शनासाठी रवाना झाली. एकूण चार बस 232 विद्यार्थी व 11 शिक्षक यांना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत सोनवणे व उपसरपंच ऋषी बाबा कदम यांनी हिरवा झेंडा दाखवला.

 सहल प्रथमता ज्योर्तिलिंग घृष्णेश्वर मंदिर या ठिकाणी गेली. पुरतन मंदिर पाहून मुलांना आनंद झाला. इयत्ता चौथीच्या मुलांना मालोजी राजांची आठवण झाली. पुढे वेरूळच्या लेण्या जवळच होत्या. दगडातील कोरीव काम पाहून मुलांनी आश्चर्य व्यक्त केले. सर्व गुफा मधील चित्रकला व गौतम बुद्धांच्या भव्य मुर्त्या पाहून विद्यार्थी हरखून गेले. पुढे भद्रा मारुती दर्शन घेऊन सहल देवगिरी किल्ल्यावर पोहोचली. देवगिरी किल्ल्यावरील मजबूत तटबंदी ,मिनार व भक्कम दरवाजे विद्यार्थ्यांना इतिहासाची साक्ष देत होते. मुलांनी किल्ल्याचे बारकाईने निरीक्षण केले. भुलभुलय्या मेंढा तोफ येथे विद्यार्थ्यांनी भेट दिली. पुढे सिद्धार्थ गार्डनमध्ये तर मुलांच्या आनंदाला पारावारच राहिला नाही. वेगवेगळ्या प्रकारचे जिवंत प्राणी ,पक्षी ,सर्प तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या खेळणी याचा विद्यार्थ्यांनी भरपूर आनंद लुटला. पुढे बीबी का मकबरा जो आईच्या आठवणी प्रित्यर्थ बांधला आहे. ताजमहालाची प्रतिकृती म्हणून ओळखला जातो. येथे भेट दिली. पुरातन वास्तु विद्यार्थ्यांनी डोळे भरून पाहिली. 

शिकण्या शिकवण्यापेक्षा विद्यार्थी परिसरात जाऊन कसा शिकतो याची प्रचिती सहलीच्या दरम्यान आली. रात्री जेवण करून सहल सुखरूप पणे रवंदे गावात पोहोचली. सहल यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक , शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शशिकांत सोनवणे ,उपसरपंच  ऋषिकेश कदम ,पालक व गावकरी यांचे विशेष सहकार्य लाभले.

Pages