श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 13 फेब्रुवारी 2025
कोपरगाव - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोपरगाव ब्रॅच, दत्तवाडी, सात चारी, या टाकळी, मुर्शतपूर, येसगाव, कोपरगाव, पंचक्रोशीतील शाळेला शंभर वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने लोकसहभागातून दिनांक 17 व 18 फेब्रुवारी रोजी 2 दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी जेष्ठ पत्रकार, व्याख्याते मा. श्री यमाजी मालकर पुणे मा. आमदार स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे, मा. श्री नितीनदादा कोल्हे, मा. श्री विवेकभैय्या कोल्हे, गटविकास अधिकारी श्री संदीपजी दळवी साहेब आदी मान्यवरांच्या उपस्थितीत माजी विद्यार्थी स्नेहमेळावा व विविध कार्यक्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवलेल्या माजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
मंगळवार दि. 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी आमदार श्री. मा.आशुतोषदादा काळे, मा. श्री राजेशजी आबा परजणे पा., गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख मॅडम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण, गुणगौरव व स्नेहसंमेलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. टाकळी, मुर्शतपूर, येसगाव, कोपरगाव पंचक्रोशीतील माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन शताब्दी महोत्सव समिती कोपरगाव ब्रॅच यांनी केले आहे.