जास्तीत जास्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सदस्य नोंदणी करून पक्षाची ताकद वाढवा -आ. आशुतोष काळे - Shramik News

Breaking

Tuesday, February 4, 2025

जास्तीत जास्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सदस्य नोंदणी करून पक्षाची ताकद वाढवा -आ. आशुतोष काळे


 श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 4 फेब्रुवारी 2025

कोळपेवाडी वार्ताहर :- नागरिकांच्या समस्या व अडीअडचणी सोडविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व पक्षाचे कार्यकर्ते नेहमीच पुढे असतात. पुढे राहण्याची हि परंपरा सदस्य नोंदणी अभियानाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी प्राधान्याने राबवून पक्षाची ताकद वाढवावी. आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त सदस्य हीच पक्षाची खरी सशक्तता आहे. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानात मतदार संघातील जास्तीत सदस्य नोंदणी करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ताकद वाढवावी असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.


विधानसभा निवडणुकीत नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (अजितदादा पवार गट) वतीने कोपरगाव मतदार संघात पक्षाची ताकद वाढवून पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सदस्य नोंदणी महाअभियानाचा शुभारंभ आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते.


ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार धारेवर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष जनसेवेचे काम करीत आहे. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंगेस पक्षाला मोठे यश मिळाले हे जनतेचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर असलेल्या  विश्वासाचे प्रतिक आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा प्रगतीशील विचारधारा असलेला पक्ष असून हि विचारधारा जपणाऱ्या ना.अजितदादांचे हात बळकट करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.


त्यासाठी कोपरगाव मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची जास्तीत जास्त सदस्य नोंदणी होणे अत्यंत गरजेचे असून कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळेच पक्षाचा विस्तार होण्यास मोठी मदत होणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त सदस्य नोंदणीवर भर देवून प्रत्येक कार्यकर्त्याने सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी राबणारा पक्ष हि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ओळख व पक्षाची  विचारधारा घराघरात पोहोचवावी. आपण पाच वर्षात जनतेला अपेक्षित असलेली केलेली जनहिताची कामे व यापुढील काळात मतदार संघात करणार असलेली कामे जनतेला सांगा. पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी  कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सदस्य नोंदणी महाअभियानात स्वत:ला झोकून द्यावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Pages