गुरुजनांचा आदर करणे आपली संस्कृती - धोंडीराम सिंह राजपूत - Shramik News

Breaking

Monday, February 10, 2025

गुरुजनांचा आदर करणे आपली संस्कृती - धोंडीराम सिंह राजपूत


 श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 10 फेब्रुवारी 2025

रवंदे - पी एम सी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रवंदे येथे नुकतेच सुप्रसिद्ध साहित्यिक कवी लेखक धोंडीराम सिंह राजपूत यांनी विद्यार्थ्यांना बाल संस्कार शिक्षण खेळ आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले. रवंदे गावचे उपसरपंच ऋषिकेश कदम, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत सोनवणे, पंचायत समितीचे विषय तज्ञ  विवेक सोनवणे यांनी प्रख्यात साहित्यिक धोंडीराम सिंह राजपूत यांचे स्वागत केले. महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पीएम श्री अंतर्गत तज्ञ व्यक्ती धोंडीराम सिंह राजपूत यांचे व्याख्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रवंदे येथे आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुलांनी गुरुजनांचा आदर केला पाहिजे, आई-वडिलांचा आदर केला पाहिजे, मेहनत आणि कष्ट या गोष्टी जीवनात आनंद आणि सुख समाधान देतात. विद्यार्थी हे देशाचे उज्वल भविष्य आहेत, शिक्षकांनी त्यांना तन मन धनाने शिकवावे. प्रत्येक विद्यार्थ्यांचा कल कशाकडे आहे तो हेरून त्याला चालना द्यावी. जात धर्म भेदभाव न करता प्रत्येक मूल समान आहे, हा भाव मनी बाळगावा. मुलांना मोटिवेशन करण्यासाठी अनेक कथा धोंडीरामसिंह राजपूत यांनी सांगितल्या. ज्या मुलांनी प्रश्नांची उत्तरे दिली त्यांना स्वतः चॉकलेट दिले. विद्यार्थीही व्याख्यानाचा आनंद घेत होते. या व्याख्यानासाठी प्रवीन आहेर, शशिकांत सोनवणे, अशोक थोरात, आदिनाथ जपे, बेबी कराळे, लता साळवे, मंगल तांबे, कवाडे मावशी, शितल मोरे, चंद्रकला डांगे, कविता झरेकर, भाऊसाहेब पवार, पल्लवी पवार, काळे, कोमल लामखडे आदी शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन सोमनाथ मंडाळकर तर आभार पंचायत समितीचे साधन व्यक्ती विवेक सोनवणे यांनी मानले.

Pages