श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 7 फेब्रुवारी 2025
कोपरगाव - त्यागमूर्ती माता रमाई भीमरावजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरात आयोजित मिरवणुकीत कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे सहभागी झाले व त्यांनी अभिवादन केले.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे राष्ट्रपुरुष आपल्या देशात घडले त्यांच्या अद्वितीय कार्याच्या मागे माता रमाई यांनी केलेला त्याग हा अविस्मरणीय आहे.या महान त्यागामुळेच गौरवशाली राष्ट्र घडते आहे कारण प्रतिकूल काळात त्याग आणि समर्पणाची ज्योत त्यांनी प्रज्वलीत केली त्यामुळेच आजचे सुवर्णक्षण देशाला लाभले आहेत अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
देश राष्ट्रपुरुषांनी दिलेल्या विचारावर घडत असतो. भारताला जगातील सर्वात आदर्श राज्यघटना बहाल करणारे घटनाकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची संपत्ती मिळाली आहे. आज देश पुढे घेऊन जाण्यासाठी न्याय, समता,बंधुता ही मूल्य जतन करणे हा खरा आदर्श आहे. माता रमाई यांच्या जीवनात अनेक प्रसंगाना त्यांनी धीराने तोंड दिले त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांना देशासाठी काम करताना मोलाची साथ लाभली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सर्व जडणघडणीत पाठबळ रमाई यांनी दिले. सोन्याच्या दागिन्यापेक्षा वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दोन घास मिळावे याला महत्व देणाऱ्या मोठ्या विचारांच्या रमाई होत्या. त्यांनी समाजासाठी बाबासाहेबांच्या रूपाने एक मौल्यवान महापुरुष पुढे येत असताना त्यांना मोलाची साथ दिली ही बाब आपण जीवनात आदर्श ठेवत मार्गक्रमण करण्यासाठी ऊर्जदायक आहे. माता रमाई यांचे कार्य,त्याग आणि समर्पण यांचे स्मरण नव्या पिढीला असावे यासाठी कोपरगाव शहरात सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने निघालेल्या रथयात्रेत सहभागी होत विवेकभैय्या कोल्हे यांनी अभिवादन केले.
याप्रसंगी आंबेडकरी चळवळीचे नेते जितेंद्र रणशूर,अध्यक्ष योगेश शिंदे, उपाध्यक्ष गौतम रणशूर,अतुल गुंजाळ, विवेक पगारे,निलेश वाघ, राजेंद्र उशिरे,मिरवणूक प्रमुख वैभव रणशुर आदींसह शंकर बिऱ्हाडे आणि समाज बांधव,भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.