श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 19फेब्रुवारी 2025
कोळपेवाडी वार्ताहर :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या शेतकरी निवासच्या प्रांगणात कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे,सेक्रेटरी बाबा सय्यद, असी.सेक्रेटरी संदीप शिरसाठ, फायनान्स मॅनेजर सोमनाथ बोरनारे, चीफ इंजिनिअर निवृत्ती गांगुर्डे, चीफ केमिस्ट सुर्यकांत ताकवणे, शिवजयंती कमिटीचे अध्यक्ष अॅड. सुजय जगताप, उपाध्यक्ष स्वप्नील काळे, सर्व सदस्य तसेच सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी जय भवानी, जय शिवाजी घोषणा देवून उत्साहपूर्ण वातावरणात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.