सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांत सुरक्षा सप्ताह साजरा. अपघात टाळण्यासाठी नियम पाळा- मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव जी. सुतार. - Shramik News

Breaking

Tuesday, March 11, 2025

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांत सुरक्षा सप्ताह साजरा. अपघात टाळण्यासाठी नियम पाळा- मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव जी. सुतार.


 

श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दि ८ मार्च २०२५

कोपरगाव -  सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याबरोबरच विविध उद्योगातील कार्यरत कर्मचा-यांच्या व्यक्तीगत सुरक्षेला संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांनी सतत प्राधान्य देत त्यासाठीची सर्व आधुनिक सुरक्षा साधने उपलब्ध करून दिलेली आहे, तेंव्हा कामगारांनी अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन करून काम करावे असे आवाहन मॅनेजिंग डायरेक्टर श्री. बाजीराव जी. सुतार यांनी केले.


           सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांत शनिवारी ५४ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे होते. सुरक्षा ध्वजवंदनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली, स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यांत आले. कार्यस्थळावरील कामगार सुरक्षा साधने प्रदर्शनाचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे यांच्या हस्ते उदघाटन करण्यांत येवुन उपस्थित सर्व कामगारांना यावेळी सुरक्षा शपथ देण्यांत आली.

           प्रारंभी व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांनी आधुनिक सुरक्षा साधनांची आवश्यकता आणि त्याचा वापर याबाबत माहिती देवुन युवानेते विवेक भैय्या कोल्हे हे सतत अपघात टाळण्यासाठी काय उपाययोजना करावयाच्या याचा आढावा घेवुन सुचना करतात.   रासायनिक पदार्थ हाताळतांना, तसेच अपघात झाल्यास काय काळजी घ्यायची याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. साखर सर व्यवस्थापक शिवाजीराव दिवटे व सुरक्षा अधिकारी सलमान शेख यांनी उपस्थितांचे स्वागत केले.


             श्री. बाजीराव जी. सुतार पुढे म्हणाले की, नियम पाळले नाही की, यम येतो तेंव्हा औद्योगिक कारखान्यात काम करतांना स्वतःबरोबरच परिसराच्या सुरक्षेला सर्वांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे, मानवी चुकातुन अपघात होतात ते टाळण्यासाठी विविध प्रशिक्षण शिबीरे, चर्चासत्रे आयोजित केली जातात, केंद्र व राज्य शासनाच्या तसेच साखर संघ मार्फत कामगार व सुरक्षा विभागामार्फत वेळोवेळी प्रसारित होत असलेल्या सूचनांचे साखर कारखान्यात तंतोतंत पालन केले जाते, त्यातुन सर्वांनी बोध घ्यावा, काम करतांना निष्काळजीपणा टाळावा, आपल्या जीवनाबरोबरच कारखान्याच्या सुरक्षेला महत्व देवुन सतत होणा-या चुका टाळाव्या, कामगारांनी देखील अपघात टाळण्यासाठी काही सूचना असतील तर त्या व्यवस्थापनास द्याव्यात. आयुष्य अनमोल आहे हे प्रत्येकाने लक्षात घेऊन काम करताना सुरक्षेला प्रथम प्राधान्य द्यावे.


              गेल्या वर्षभरात कारखान्यांत अपघात टाळण्यासाठी ज्या कामगारांनी मदत केली त्यांचा उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे, संचालक बाळासाहेब वक्ते, बापूसाहेब बाराहाते, मनेष गाडे, ज्ञानेश्वर होन, रमेश घोडेराव, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, कामगारनेते मनोहर शिंदे, वेणुनाथ बोळीज, आदिंच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व भेटवस्तु देउन  सत्कार करण्यांत आला. शेवटी कामगारनेते मनोहर शिंदे यांनी आभार मानले.

         या कार्यक्रमांस एच आर मॅनेजर विशाल वाजपेयी, वर्क्स मॅनेजर व्ही. एम. भिसे, सुरक्षा अधिकारी रमेश डांगे, हेड टाईम किपर भास्करराव बेलोटे, यांच्यासह विविध खात्याचे प्रमुख, उपखातेप्रमुख, कामगार मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुरक्षा अधिकारी सलमान शेख यांनी केले.

Pages