अहिल्यानगर - भरमसाठ शिक्षक संघटना, बख्खळ नेते आणि काम शून्य,अशी अहिल्यानगर जिल्ह्यातील परिस्थिती असतांना सामान्य शिक्षकांचा वापर फक्त शिक्षक बँकेच्या राजकारणासाठी केला जात असल्याची भावना झाल्याने सामान्य शिक्षकांचा संघटना आणि नेत्यांवरील विश्वास उडाला असून कोणतं वासरू कोणत्या गाईला पितंय अशी अवस्था जिल्ह्यातील शिक्षक नेत्यांची झाली असल्याने स्वतंत्र समता शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र विधाते यांनी म्हटले आहे.
अध्यापनाचे काम सोडून शिक्षकाला माहिती बनविणे, ओंनलाईन कामे करणे यातच गुंतवून ठेवले जात आहे.तात्काळ माहिती मागविली जाते. जवळपास 130 च्या पुढे अवांतर कामे शिक्षकावर लादलेली आहेत. हिकामे काही एका दिवसात लादली गेली नाहीत. शिक्षक संघटना आणि शिक्षक नेत्यांनी वेळीच आवाज उठवला असता तर अशी परिस्थिती ओढवली नसती. परंतु जिल्ह्यातील सर्व शिक्षक नेते, संघटना यांचे राजकारण शिक्षक बँक भोवती फिरताना दिसत आहे. नेत्यांना फक्त बँक ताब्यात लागते बँकेच्या राजकारणातून सध्या दोन गटात शीतयुद्ध सुरु आहे त्यचा भडका उडालेला जिल्ह्याने मध्यंतरी अनुभवलेली आहे. एकमेकांची जिरवाजिरवी सुरु आहे त्यातून दिवसा रात्री कधीही स्वहिताची समीकरणे जुळविण्यासाठी उड्या मारण्याचे प्रयोग सुरु आहेत. सामान्य शिक्षकांनी आपली समस्या कोणाला सांगावी असा प्रश्न पडला आहे.कारण कोणतं वासरू कोणत्या गाईला पितंय हेच कळेनासे झालंय अशी जिल्ह्याची परिस्थिती झाली असल्याची सर्व सामान्य शिक्षकांची झाली आहे.