श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 15 मार्च 2025
अहिल्यानगर - शिक्षण आणि नोकऱ्यातील आरक्षण खाजगीकरनाच्या नावाखाली बंद करण्यात आले,आम्ही काही बोललोच नाही....त्यांनी पदोन्नती मधील आरक्षणही बंद केले , आम्ही काही बोललोच नाही.....कारण आम्ही संघटित नाही ....त्यांनी चोरमार्गाने उच्चवर्गीय IAS भरतीचा प्रयोग केला.....आम्ही काही बोललोच नाही.,...कारण आम्ही संघटित नाही ! .......आणि आता तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान बदलून ''ऋषी संविधान ' येणार म्हणतात.तरीही आम्ही गप्पच......! बांधवांनो जरा भूतकाळात जा. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान लागू होण्यापूर्वी भारतात कोण्या एका ऋषीच्या मनुस्मृतीचे राज्य होते. ब्राम्हण , क्षत्रिय,वैश्य आणि क्षुद्र हे चार वर्ण होते.या चार वर्णांपैकी तुमचा वर्ण कोणता? याचा चांगला विचार करा ...उगीच लाख रुपयाच्या पगारान आपला भूतकाळ विसरू नका. जे लोक आपला इतिहास विसरतात ते इतिहास घडवत नाहीत ..ते गुलाम असतात.आपण या देशाचे राजे असताना आपल्याला मनुस्मृतीने गुलाम बनवून टाकले होते आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला गुलामीतून मुक्त करत माणूस केले , राजा बनवले .आपण देशाचे राजे असून आपल्या विरोधी षडयंत्र रचले जात आहे .आरक्षणाची होळी चालू आहे ,संविधान बदलून आपल्याला पुन्हा सुटबुटातील गुलाम बनवण्याचा घाट घातला जातोय ..,! जरा विचार करा.,., जागे व्हा...,संघटित व्हा असे आवाहन समता शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र विधाते यांनी केले आहे.