QR कोड ' विषय संपलेला आहे - राजेंद्र विधाते - Shramik News

Breaking

Monday, March 3, 2025

QR कोड ' विषय संपलेला आहे - राजेंद्र विधाते


श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 3 मार्च 2025
   अहिल्यानगर - प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन उपस्थिती बाबत जानेवारी२०२५ मध्ये सुरू झालेला विषय केंव्हाच संपलेला असून शिक्षकांनी भीतीतून बाहेर यावे असे आवाहन समता शिक्षक मंचाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र विधाते यांनी केले आहे.QR कोड उपस्थिती शिवाय जानेवारी २०२५ चा पगार निघणार नाही,अशी भीती दाखवल्याने शिक्षकांनी QR कोड उपस्थिती नोंदवली होती.तसेच वरिष्ठ अधिकारी भेट देऊन प्रशासकीय कारवाई होईल ,या भितीपोटीही काहींनी QR कोड उपस्थिती नोंदवली होती.मात्र अशा प्रचंड दबावात सुद्धा ज्यांनी QR कोड उपस्थिती नोंदवली नाही त्यांचे मनापासून अभिनंदन. 



 काही तालुक्यात DD02 यांनी DD01यांना प्रत्यक्ष बोलाऊन पगार न काढण्याची धमकीही दिली .अशा प्रसंगी DD01 यांनी ' आम्ही आमची दैनिक हजेरी शिक्षक हजेरीवर नोंदवतो आहे ' त्यामुळे आमचे पगार काढावेत आणि जर पगार काढले नाहीतर ,आम्हाला कोर्टात जावे लागेल,असे स्पष्टपणे DD02 यांना सुनावले. आणि त्याच दिवशी दुपारी मा.आयुक्त  नाशिक यांनी सर्वांचे पगार काढण्याचे आदेश दिले आणि कालपरवा सर्वांचे पगार झाले ,इथेच QR कोड उपस्थिती प्रश्न निकाली निघाला असून सर्वांनी भीती सोडावी .   QR कोड उपस्थिती हा आपल्या एका जिल्ह्याचा विषय होता,तो सोडवण्यासाठी मुंबईला जाण्याची गरज नाही.उलट पुढे काही दुर्घटना घडली तर उच्च न्यायालयात जाण्याची तयारी ठेवावी .संपलेल्या आणि बेकायदेशीर प्रश्नावर भेटीगाठी आणि चर्चा झाल्या तर काल एका गृपवर जसा शाब्दिक उद्योग होतो तसा आपल्यात वाद होऊन एकीत फूट पडू शकते.   मी संविधानाला मानणारा कार्यकर्ता असल्याने बेकायदेशीर QR कोड उपस्थिती वर संविधान आणि आरक्षण विरोधी शक्तीची मदत न घेता संविधानाच्या मार्गाने पुढे जाणार असल्याचेही समता शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र विधाते यांनी सांगितले.



Pages