QR भीती,संच मान्यता दिशाभूल. ..मात्र सकाळची वेळ ...गोंधळात गोंधळ! - राजेंद्र विधाते - Shramik News

Breaking

Tuesday, March 11, 2025

QR भीती,संच मान्यता दिशाभूल. ..मात्र सकाळची वेळ ...गोंधळात गोंधळ! - राजेंद्र विधाते


  

श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 12 मार्च 2025

अहिल्या नगर - स्वतः ला पुढारी म्हणवणाऱ्या शिक्षक नेत्यांनी QR कोड उपस्थिती नोंदवली,त्यांचे अनुकरण काही प्रमाणात सामान्य शिक्षक बांधवांनी केले आणि नंतर हेच शिक्षक पुढारी QR नको म्हणून ओरडू लागले.पुढे QR ची भीती दाखवून आपल्या कळपात ओढण्याचा प्रयत्न ही झाला.परंतु जानेवारीचा पगार झाला आणि QR विषय संपला.पण  पुढाऱ्यांनी QR कोड ची भीती तशीच ठेवत  कळप टिकवण्याचा ,वाढण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला ,हे जिल्ह्याने पाहिले आहे .फेब्रुवारीचे पगार बील ट्रेझरीत असल्याची माहिती आहे .याबाबत खात्री करण्यासाठी परवा मी जिल्हा शिक्षण अधिकारी पाटीलसाहेबांना फोन केला होता, परंतु संपर्क होऊ शकला नाही. परंतु आपल्याला खात्रीने सांगतो ,QR कोड उपस्थिती विषय संपलेला आहे ,भीतीने उपस्थिती नोंदवू नका. आढावा देऊ नका. नाहीतर नवीन भूत माथी मारले जाईल.       संच मान्यता विषयांवर प्रत्येक संघटनेने आपले विचार मांडून काही दुरुस्ती राज्यशासनाकडे केलेली होती .त्यासर्वांची दखल राज्यशासनाने घेऊन १० मार्चच्या gr मध्ये थोडीशी मागणी मान्य केलेली आहे ,यात सर्वच संघटनांचे योगदान आहे ,हे मान्यच करावे लागेल.                     सकाळी शाळा भरणार म्हणून एका ग्रुपवर रात्री ' जागरण गोंधळाचा कार्यक्रम ' झाला.वेगवेगळी टीकाटिप्पणी झाली.एक सूर....खूप संघटना झाल्या...... बांधवांनो , जरा विचार करा ...पूर्वीच्या संघटनांनी चांगले आणि योग्य काम केले असते तर ..नवीन संघटना निघाल्या असत्या का ? दिवसागणिक शिक्षक आणि समस्या वाढत आहेत ,संघटना वाढत आहेत आणि..... ' आम्ही समस्या सोडवतो ' हाकाटी सुरू आहे.जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या व्यावसायिक समयांबरोबर सामाजिक प्रश्न सोडविणे हे सुद्धा खूप महत्वाचे आहे.त्यासाठीच स्वतंत्र शिक्षक संघ कार्य करत असल्याचे स्वतंत्र समता शिक्षक  अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र विधाते यांनी सांगितले आहे . ज्यांना काही अडचण असल्यास 8805082428 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन राजेंद्र विधाते यांनी केले आहे.



Pages