कोपरगाव - कोपरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व बस स्थानक, एम एस इ बी कार्यालय कोपरगाव येथे भारताचे संविधान निर्माते, विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी गुणवंतांचा गौरव देखील करण्यात आला.
या कार्यक्रमात बस स्थानकातील कर्मचारी यांच्या दोन कन्यांनी वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मोठे यश मिळवले. डॉक्टर अंकिता कचरू निकम आणि डॉक्टर दिशा बाळासाहेब केकान यांनी एमबीबीएस पदवी उत्तीर्ण केली. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आगार व्यवस्थापन आणि संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, मा. आ. स्नेहलताताई कोल्हे, युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या वतीने गुणवंतांचा सन्मान करून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.कोपरगाव एम एस इ बी कार्यालय येथे आयोजित जयंती उत्सवास उपस्थित राहून अभिवादन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण देशाचा अभिमान आहेत. ते विचारवंत, क्रांतिकारक आणि सामाजिक परिवर्तनाचे महान प्रतीक होते. 'शिका, संघटित व्हा, संघर्ष करा' हा त्यांचा मंत्र आजही प्रत्येक पिढीला नवे बळ देतो. सर्वांना एकोप्याने पुढे घेऊन जाण्याचे काम त्यांनी केले आणि आपल्या देशाला जगातील आदर्श संविधान देण्याचे कार्य त्यांनी केले असे विचार पराग संधान यांनी या प्रसंगी व्यक्त केले.
या कार्यक्रमास अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान,सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना संचालक रमेशराव घोडेराव, संचालक विश्वासराव महाले, संचालक बाळासाहेब वक्ते,भाजपा शहराध्यक्ष डी. आर. काले, औद्योगिक वसाहतीचे उपाध्यक्ष केशवराव भवर,मा.गटनेते रवींद्र पाठक, मा.नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,प्रदीपराव नवले, विजराव आढाव,बबलु वाणी,जितेंद्र रणशूर,गोपीनाथ गायकवाड, सत्येन मुंदडा, जनार्दन कदम, नशिरभाई सैय्यद, वैभव गिरमे, सद्दामभाई सैय्यद, खालिकभाई कुरेशी, अशोक लकारे, आगार व्यवस्थापक अमोल बनकर, स्थानक प्रमुख योगेश दिघे, वहातूक निरीक्षक गिरिश खेमनर, वहातूक निरीक्षक अमित हंगे, आगार लेखापाल सुनीता गवळी, वैभव आढाव, राजेंद्र बागुल, रवींद्र रोहमारे, आकाश वाजे, विष्णुपंत गायकवाड, फकिरमंहमद पहिलवान, दिपक जपे, जगदीश मोरे, अकबरभाई शेख, शंकर बिर्हाडे, सुजल चंदनशिव, प्रभुदास पाखरे, चंद्रकांत वाघमारे, सचिन सावंत, मुकुंद उदावंत यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.