महावितरण कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी - Shramik News

Breaking

Wednesday, April 16, 2025

महावितरण कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी


 कोपरगाव - महावितरण कोपरगाव पॉवर हाऊस येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती महादेव दिवटे वरिष्ठ तंत्रज्ञ राहता यांच्या अध्यक्षतेत अतिशय मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

 या संयुक्त जयंती महोत्सवासाठी प्रोफेसर अनिल पावटे हे मार्गदर्शन करण्यासाठी प्रामुख्याने उपस्थित होते. त्याचबरोबर कोपरगाव शहर चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री धांडे साहेब कोपरगाव ग्रामीणचे सहाय्यक अभियंता श्री. हर्षद बावा स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचे केंद्रीय सरचिटणीस जालिंदर पांढरे  यांनी मार्गदर्शन केले.

 कार्यक्रमाचे प्रस्ताविक संदीप रावसाहेब जाधव यांनी सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाल्मीक सानप यांनी केले स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस जालिंदर पांढरे यांनी महात्मा फुले यांचा जीवन परिचय व त्यांच्या कार्याचे महती डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आंदोलने व त्या आंदोलनाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. हर्षद बावा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगाराकडून काय अपेक्षा ठेवली होती याची माहिती दिली व कामगार संघटनांनी राजकीय परिक्षेत्र व्यापले पाहिजे हे ठणकावून सांगितले. धनंजय धांडे  यांनी महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र उघडून दाखवले. मुख्य वक्ते प्राध्यापक अनिल पावटे सरांनी आजच्या काळातील आंबेडकरी चळवळीची गरज व आंबेडकरी चळवळीचे महत्त्व समजून सांगितले  संदीप जाधव यांनी प्रास्ताविकामध्ये पॉवर हाऊस कोपरगाव मध्ये होणाऱ्या या संयुक्त जयंतीचे महत्त्व याची सुरुवात व या अनुषंगाने अनेक वीज कर्मचाऱ्यांपर्यंत फुले शाहू आंबेडकरी विचार पसरवण्यासाठी होणारा उपयोग नमूद केला. वाल्मिक सानप यांनी अनेक इतिहासाची दाखले सूत्रसंचालनातून दिली अतिशय सुंदर हा कार्यक्रम झालेला आहे.

सानप यांची मुलगी वेदश्री सानप यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेवर अतिशय मौलिक असे भाषण सादर केले आहे, आलेल्या मान्यवरांचे सन्मान बाबासाहेबांच्या विचारांचे "बहुजन ऊर्जा" स्मरणिका हे पुस्तक देऊन एक वेगळा आदर्श निर्माण करत स्वागत केले. हा कार्यक्रम सुंदर बनवण्यासाठी आयोजक समिती सदस्य, सतीश देसाई,राजेंद्र भोसले, एकनाथ शार्दुल, सिताराम खंडागळे,कैलास पवार, दिनेश राजपूत, शाम ओढेकर, संतोष पवार, किरण अत्रे, विशाल लकारे, राजेंद्र निकम, अतुल वनकर, कुलदीप सुरतकर, शाहरुख सय्यद, सागर गायकवाड, रवी भुजबळ, हरिभाऊ चौथमल तसेच महिला सदस्या सुवर्ण आहेर,काजल तरजुले, रश्मी ढोक यांनी अतिशय मोलाचे कष्ट घेतले.

 यावेळी अभियंता प्रशांत बोंडखळ, अनिकेत निर्भवने, अमोल बोडखे तसेच धीरज भिंगारदिवे, नाना भाऊ गोरडे,मयुर अष्टेकर सुनील फापळे, प्रसन्नजीत बर्डे प्रामुख्याने उपस्थित होते. स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी सहकारी पतसंस्था कोपरगाव पतसंस्थेचे चेअरमन  धनंजय बंद्रे यांनी उपस्थितीत सर्वांचे आभार व्यक्त केले आहे.

Pages