कर्मवीर शंकररावजी काळे यांची रविवार रोजी १०४ वी जयंती - Shramik News

Breaking

Saturday, April 5, 2025

कर्मवीर शंकररावजी काळे यांची रविवार रोजी १०४ वी जयंती


  कोळपेवाडी वार्ताहर - कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक–संचालक, शिक्षण, सहकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा आणि आणि नेतृत्वाचा ठसा उमटविणारे माजी खासदार स्व.कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या १०४ व्या जयंती निमित्त रविवार दिनांक ६ एप्रिल  रोजी सकाळी ९.०० वाजता कर्मवीर शंकरराव काळे स्मृती-उद्यान गौतमनगर येथे व सकाळी १०.०० वाजता पंचायत समिती कोपरगाव येथे पुष्पांजली कार्यक्रम होणार असल्याची माहिती कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन यांनी दिली आहे.


              या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी माजी आमदार अशोकराव काळे, सौ.स्नेहलताताई शिंदे, गौतम बँकेच्या माजी संचालिका सौ.पुष्पाताई काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे तसेच कारखान्याचे व्हा.चेअरमन, संचालक मंडळ, कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे सर्व सदस्य व विविध संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांवर व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना तसेच उद्योग समुह व काळे परिवारावर प्रेम करणा-या हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे उपाध्यक्ष नारायणराव मांजरे यांनी केले आहे.

Pages