कोपरगावात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन - Shramik News

Breaking

Sunday, April 20, 2025

कोपरगावात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन


 कोळपेवाडी वार्ताहर :-  संपूर्ण कोपरगाव मतदार संघात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त कोपरगाव येथे आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोपरगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pages