कोपरगाव - कोपरगाव शहरातील नागरिकांना दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतात. पाच नंबर तळ्यावर तुणतुणे वाजवीत विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत नागरीकांना घोषणा देऊन दारोदारी प्रचार दरम्यान सांगत फिरत होते कि, शहराला पाणीपुरवठा दोन दिवसाआड दिला जाईल. आता तर आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो आहे याला जबाबदार कोण आहे हे नागरीकांनी शोधले पाहिजे हे राजकीय नेते खोटं आमीष दाखवून राजकारण करतातच पण नागरीकांना हेच लक्षात येत नाही कि खोटं आश्वासन दिलेले राजकीय नेते किती शब्दाला पक्के असतात दिलेले आश्वासन किती टक्के पाळतात हे प्रथम कोपरगाव शहरातील नागरिकांनी अनुभवायला पाहीजेत, आता येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत निवडणूक पुरतं दोन दिवसाला पाणी पुरवठा देतील घोषणा करतील आणि निवडणूक झाली कि तिच समस्या पुन्हा निर्माण करतील पाच नंबर तळं काय पोहण्यासाठी केले कि दिखावा साठी केले हे शोधलं पाहिजे
राजकीय नेते यांच्या आमीषला बळी पडलेल्या मतदारसंघात विकासाच्या नावाखाली वेठीस धरणाऱ्या राजकीय नेते यांना धडा शिकवला पाहिजे यांच्या नेतृत्वाखाली कोणतंही काम पुर्ण होत नाहीत फक्त आडमुठेपणा च लक्षणं असुन नांव मोठे लक्षण खोटे नागरीकांना वेठीस धरून तळतळ करायला लावणारं राजकीय नेतृत्व या पुढे नागरीकांनी मान्य करू नये लोकशाहीचा अधिकारानुसार जीवन जगले तर गुलामगिरी हुकुमशाही नष्ट करण्यासाठी वेळ लागणार नाही
आपण आपलं हाल करून या राजकीय नेते यांना मोठं केले आहे यांच्या आमीषाला बळी पडु नये असे आवाहन आपण स्वतः येणाऱ्या नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत मतदारांना करणार आहे
आता संघर्ष हाच खरा ध्यास घेतला असून मतदारांच्या सकारात्मक विचारांसाठी विकासाची नवीन ताकद निर्माण करणार आहे हे राजकीय नेते आता एकञ येऊन आपलं राजकीय फायदा खोटे बोलून नागरीकांना उल्लु बनविण्याचे काम करणार आहे
पण मतदारसंघ याला बळी पडणार नाही
सत्य परेशान होतं पण पराजित कधीच होऊ देणार नाही हे उदाहरण सत्य आहे तेच यंदा मतदारसंघ करेल यांत तिळमात्र शंका नाही अशी माहिती पञकार प्रसिद्ध साठी शिवाजी कवडे पाटील बळीराजा पार्टी विधानसभा अध्यक्ष यांनी दिली आहे