संत ज्ञानेश्वर शाळेच्या १०० टक्के निकालाची परंपरा कायम - Shramik News

Breaking

Tuesday, May 13, 2025

संत ज्ञानेश्वर शाळेच्या १०० टक्के निकालाची परंपरा कायम



कोपरगाव (प्रतिनिधी) दि.१३

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ मार्फत घेण्यात आलेल्या एस.एस.सी परीक्षेचा निकाल नुकताच मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला. यात कोपरगाव शहरातील संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी १०० टक्के निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली असून, परीक्षेत प्रथम क्रमांक कु.पहिलवान प्राची राकेश ९१.०० टक्के, द्वितीय क्रमांक कु. शिंदे श्रद्धा रमेश ८८.०० टक्के, तृतीय क्रमांक कु. देवडे भक्ती किशोर ८७.०० टक्के मिळविला आहे.


शाळेचा निकाल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शंभर टक्के लागला. विशेष म्हणजे तब्बल १५ विद्यार्थ्यांनी ८० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहे तर २१ विद्यार्थ्यांनी ७५ टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेची शंभर टक्के निकालाची परंपरा तसेच कृतीयुक्त शिक्षण, वेळेचे योग्य नियोजन व विद्यार्थ्यांकडून पूर्वपरीक्षेच्या माध्यमातून सराव करून घेतल्याने शाळेची गुणवत्ता उंचावली आहे. त्यामुळेच या शैक्षणिक वर्षात शाळेच्या प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष राजेंद्र झावरे, उपाध्यक्ष किरण भोईर, विश्वस्त राजेंद्र सालकर,कैलास जाधव, पोपट झुरळे,विशाल झावरे, मुख्याध्यापक सचिन मोरे,उपमुख्याध्यापिका वैशाली लोखंडे व सर्व शिक्षकांनी सर्व विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

Pages