कोपरगाव (प्रतिनिधी) – अहिल्यानगर जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची ओळख निर्माण केलेल्या अहिल्या नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील समता इंटरनॅशनल स्कूल या नामांकित, उपक्रमशील आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या आणि विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानलेल्या शाळेने यंदाच्या दहावीच्या सीबीएसई परीक्षेच्या निकालात आपली उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. सलग ९ वर्षे शंभर टक्के निकालाची परंपरा राखणाऱ्या समताने यंदाही एक उत्कृष्ट कामगिरी साकारली आहे.
शाळेचे विद्यार्थी दर्शील भरत अजमेरा (९९ %), हर्षद नवनाथ जाधव ( ९९ %), अन्वी संजय उंबरकर ( ९८ %), दीक्षा प्रवीणकुमार दोषी (९६.८०%), प्रथमेश सुमित भट्टड (९६.६० %), सोहम बाबासाहेब साताळकर (९६ %), आर्यन भरत कुमार (९५.६०%), मानसी कैलास भुसारे (९५ %), नक्षत्रा जयसिंग मर्मट (९५%) यांनी अव्वल यश संपादन करत शाळेच्या यशात भर घातली आहे.
विशेष म्हणजे दर्शील याला विज्ञान विषयात तर हर्षद याला इंग्रजी आणि आयटी या दोन्ही विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त झाले आहेत. अजिंक्य दिलीप मुठे याने देखील इंग्रजी व आयटी या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले आहे. तसेच अन्वी संजय उंबरकर, दीक्षा प्रवीणकुमार दोषी, सोहम बाबासाहेब साताळकर, आर्यन भरत कुमार या यांनीही आयटी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवत उज्वल यश मिळविले आहे.
समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, कार्यकारी विश्वस्त सौ स्वाती कोयटे, व्यवस्थापन समिती सदस्य, प्राचार्य समीर अत्तार यांनी समता पॅटर्नच्या यशस्वी अंमलबजावणीचे श्रेय शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थ्यांना देत सर्वांचे विशेष अभिनंदन केले. यशस्वी निकालामुळे कोपरगाव व परिसरात शाळेच्या शैक्षणिक कार्याची पुन्हा एकदा दखल घेतली जात आहे.