नगरपालिका समस्या संदर्भात आ.आशुतोष काळेंचा सोमवार (दि.०५) रोजी जनता दरबार - Shramik News

Breaking

Saturday, May 3, 2025

नगरपालिका समस्या संदर्भात आ.आशुतोष काळेंचा सोमवार (दि.०५) रोजी जनता दरबार


 कोपरगाव वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यात आघाडीवर असणारे  आ. आशुतोष काळे  नागरीकांचे शासकीय कार्यालातील प्रश्न व अडचणी सोडविण्यात देखील आघाडीवर आहेत. यासाठी त्यांनी जनता दरबार हा उपक्रम मागील सहा वर्षापासून अविरतपणे राबविला आहे. सोमवार (दि.०५) रोजी दुपारी २.०० वाजता कोपरगाव शहरातील नागरिकांच्या कोपरगाव नगरपालिकेच्या संदर्भातील समस्या व अडचणी सोडविण्यासाठी तहसील कार्यालयात ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.


आ.आशुतोष काळे यांनी सुरु केलेल्या जनता दरबारामुळे मतदार संघातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यास मोठी मदत झाली आहे. त्यामुळे प्रत्येक जनता दरबारात समस्या घेवून येणाऱ्या नागरिकांच्या गर्दीने तहसील कार्यालयाच्या सभागृहात मोठी गर्दी होत आहे. सोमवार (दि.०५) रोजी कोपरगाव शहरातील नागरिकांसाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या जनता दरबारात नगरपालिका क्षेत्रातील कोपरगाव शहरातील नागरिकांनी कोपरगाव नगरपालिकेच्या संदर्भातील आपल्या समस्या व अडचणी लेखी स्वरूपता मांडाव्यात असे आवाहन आ.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Pages