नवस, निष्ठा आणि नवसपूर्ती कार्यकर्त्याच्या अनोख्या समर्पणाला आ.आशुतोष काळेंची साथ" कार्यकर्त्यांच्या निःस्वार्थ भावनेतून अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा- आ. आशुतोष काळे - Shramik News

Breaking

Wednesday, May 7, 2025

नवस, निष्ठा आणि नवसपूर्ती कार्यकर्त्याच्या अनोख्या समर्पणाला आ.आशुतोष काळेंची साथ" कार्यकर्त्यांच्या निःस्वार्थ भावनेतून अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा- आ. आशुतोष काळे


कोळपेवाडी वार्ताहर - कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून २०१९ ला निवडून आलेले आमदार आशुतोष काळे पुन्हा एकदा आमदार व्हावेत यासाठी पायात चप्पल न घालन्याचा त्यांच्या कार्यकर्त्याने केलेला संकल्प आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते सोमवार (दि.०५) रोजी नवसाला पावणारे जागृत देवस्थान श्री निझर्णेश्वराला रुद्राभिषेक करुन व ५१ जोडप्यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करुन पूर्ण केला. यानिमित्ताने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नेत्यावर जीवापाड प्रेम करणारा कार्यकर्ता आणि कार्यकर्त्याला जीवापाड जपणारा नेता असा अनोखा संगम पहावयास मिळाला. यातून नवस, निष्ठा आणि नवसपूर्ती या कार्यकर्त्याच्या समर्पणाला आ.आशुतोष काळे यांची अनोखी साथ मिळत असल्याचे दिसून आले.

कोपरगाव तालुक्यातील काकडी येथील काळे गटाचे निष्ठावान कार्यकर्ते व आ.आशुतोष काळे यांच्यावर प्रेम करणारे मधुकर गुंजाळ यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आ.आशुतोष काळे  पुन्हा आमदार व्हावे यासाठी पायात चप्पल न घालण्याचा शिवसंकल्प करून नवस केला होता. केलेल्या शिवसंकल्पात त्यांनी आजपर्यंत अनवाणी चालण्याबरोबरच अनुष्ठाणब्रह्मचर्य पालनउपवासशिवलीला अमृत ग्रंथाची चार पारायणेभगवान महादेवाला चार रुद्राभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम केले होते.

आ. आशुतोष काळे यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर मतदार संघातील जनतेने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना ऐतिहासिक मताधिक्य देत तब्बल सव्वा लाखाच्या मतांनी पुन्हा आमदार केले. त्यामुळे आपण केलेला नवस पूर्ण झाल्यानंतर जवळपास आठ महिन्यांपासून अनवाणी पायांनी चालणाऱ्या मधुकर गुंजाळ यांनी श्री निझर्णेश्वराला आ. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत सपत्नीक पत्नी सौ. संगीता गुंजाळ यांच्या समवेत रुद्राभिषेक करुन व ५१ जोडप्यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करुन पायात चप्पल परिधान केली.

यावेळी कार्यकर्त्यांचे अतूट प्रेमातून भावनिक झालेल्या वातावरणामुळे आ.आशुतोष काळे देखील भावनाविवश झाले होते.लोकशाहीत अशा प्रकारची निष्ठा दुर्मिळ मानली जाते. स्वतःच्या जीवावर उदार होऊन काम करणारे कार्यकर्ते राजकारणात फार कमी वेळा भेटतात. कार्यकर्त्यांकडून अशी निष्ठा आणि प्रेम मिळणं हे माझं भाग्य आहे व त्याचबरोबर माझ्यासाठी भावनिक आणि अभिमानाची बाब आहे. कार्यकर्त्यांची अशी निःस्वार्थ भावना मला अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा देते.या कार्यकर्त्याच्या निष्ठेने मला भारावून टाकले असून जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या या विश्वासामुळे माझ्यावरची जबाबदारी आणखी वाढली आहे. मी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी ही श्रद्धा माझ्यासाठी प्रेरणास्थान असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

 

Pages