महावितरणच्या डिजिटल ग्राहक योजनांचे विजेते जाहीर - Shramik News

Breaking

Thursday, May 8, 2025

महावितरणच्या डिजिटल ग्राहक योजनांचे विजेते जाहीर

कोपरगाव :  कंपनीच्या लकी डिजिटल ग्राहक या नवीन योजनेच्या माध्यमातून सलग तीन महिने ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरणा करणाऱ्या ग्राहकांमधून लकी ड्रॉ पद्धतीने ग्राहकांची निवड करण्यात आली. कोपरगाव ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. लक्ष्मण राठोड यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाच्या व द्वितीय क्रमांकाच्या ग्राहकास स्मार्टफोन तसेच पुढील क्रमांकाच्या ग्राहकांसाठी स्मार्ट वॉच हे बक्षीस वितरित करण्यात आले.

ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याने ही योजना यशस्वी ठरली. या विजेत्यांना मोबाइल फोन, स्मार्ट वॉच आणि ५००० रुपयांहून अधिक किमतीची बक्षिसे प्रदान करण्यात आली. महावितरणने ग्राहकांना डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना आणली होती. विजेते ठरवण्यासाठी पारदर्शक लकी ड्रॉ पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता.

ग्राहकांनी नियमित वीज देयक भरणा करून महावितरण कंपनीस सहकार्य करावे, तसेच महावितरणकडून देण्यात येणाऱ्या सौरऊर्जा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील

करण्यात आले.

याप्रसंगी कोपरगाव ग्रामीण उपविभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Pages