आ.आशुतोष काळेंच्या सूचनेनुसार काकडीचे बंधारे भरण्यासाठी दोन दिवसात पाईपलाईन - Shramik News

Breaking

Wednesday, May 21, 2025

आ.आशुतोष काळेंच्या सूचनेनुसार काकडीचे बंधारे भरण्यासाठी दोन दिवसात पाईपलाईन


 

कोळपेवाडी वार्ताहर :- निळवंडे कालव्याच्या पाण्यापासून वंचित राहणाऱ्या काकडी गावचे बंधारे भरून देण्यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या सुचनेनुसार दोनच दिवसात पाईपलाईनचे काम सुरु करणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी काकडी ग्रामस्थांना दिली आहे.


 निळवंडे कालव्याच्या पाण्यातून जिरायती भागातील डांगेवाडीच्या बंधाऱ्यात पाणी येत होते व मल्हारवाडीच्या बंधाऱ्यात देखील पाईपलाईनचे माध्यमातून पाणी आले आहे. परंतु काकडी गावातील बंधारे मात्र निळवंडे कालव्याच्या पाण्यातून भरली जात नव्हती. त्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पा.यांच्याकडे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत देखील मागणी केली होती. तसेच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील काकडी येथील भवानी आई बंधारा येथून त्या खालील बंधारे भरण्यासाठी पाईपलाईन बसवण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्या सूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी सोमवार (दि.१९) रोजी पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता आसिफ शेख व तुषार मंडलिक यांनी काकडीच्या शेतकऱ्यांसह पाईप लाईन टाकण्यासाठी जागेची पाहणी करून दोनच दिवसात पाईप लाईनचे काम सुरु करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच मल्हारवाडी येथील डी.वाय. तीन चारीद्वारे सोडलेल्या पाण्यामुळे बंधारे व केटीवेअर भरुन मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून त्यांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.


यावेळी बाबासाहेब गुंजाळ, राजेंद्र गुंजाळ, प्रभाकर गुंजाळ, अनिल सोनवणे, योगेश कांडेकर, प्रकाशजी सोनवणे, गजानन सोनवणे, शंकरराव दिघे, बाळासाहेब शिंदे, मधुकर गुंजाळ, पावलस सोनवणे, आप्पासाहेब शिंदे, भाऊसाहेब रोडे, सचिन गुंजाळ, भाऊराव बिबे, साहेबराव गुंजाळ, दत्तू गुंजाळ आदी उपस्थित होते

Pages