धर्मांतर घोषणा दिनानिमित्त खिर्डी गणेश येथील युवकांचा अन्नदान उपक्रम - Shramik News

Breaking

Sunday, October 13, 2024

धर्मांतर घोषणा दिनानिमित्त खिर्डी गणेश येथील युवकांचा अन्नदान उपक्रम


 कोपरगाव प्रतिनिधी - १३ ऑक्टोबर १९३५ रोजी भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला मुक्कामी घोषणा केली होती कि मी ज्या धर्मात जन्माला आलो त्या धर्मात मरणार नाही.जन्माला येण हे माणसाच्या हातात नाही,पण कोणत्या धर्मात मरायचे ते मात्र माणसाच्या हातात आहे. या घटनेला आंबेडकर अनुयायी आपल्या आयुष्यात मोलाचे स्थान देतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी उभे राहून हि गर्जना केली त्या ठिकाणावर  क्रांतीस्तंभ उभारलेला आहे आणि त्या ठिकाणाला मुक्तिभूमी म्हणून संबोधले जाते.या मुत्कीभूमिचे दर्शन घेण्यासाठी आणि क्रांतीस्तंभाला वंदन करण्यासाठी लाखो अनुयायी येत असतात.अशा या अनुयानासाठी खिर्डी गणेश येथील नवयुवक  राहुल उगले,सागर त्रिभुवन,किरण साबळे,अक्षय लोखंडे,दत्तात्रय पगारे,शुभम खंडिझोड,आदर्श पगारे,आशुतोष लोखंडे,गुरुदास लोखंडे आणि मित्रपरिवार आदींनी  येसगाव अन्नदान येथे केले..त्यांच्या या उपक्रमाचे सहावे वर्ष आहे. त्यांच्या या कार्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे  कौतुक होत आहे.

Pages