कोपरगावात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कविसंमेलन - Shramik News

Breaking

Thursday, October 17, 2024

कोपरगावात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कविसंमेलन


 कोपरगाव प्रतिनिधी  -  दरवर्षीप्रमाणे या वर्षीही कोपरगाव व परिसरातील नवोदित कवी, साहित्यिक यांना व्यासपीठ मिळवून देण्याचा कोपरगाव म सा प शाखा,

तसेच विद्यार्थी सहाय्यक समितीचा प्रयत्न असतो.म. सा. प. चे अध्यक्ष डॉ. हिरालालजी महानुभाव, कार्याध्यक्ष राजू कोयटे, कार्यवाह संतोष तांदळे यांच्या संकल्पनेतून या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले,या कार्यक्रमाला अनेक नव्या जुन्या कवीनी हजेरी लावली अनेक दर्दी,  रसिकांची मांदियाळी जमली होती अनेक बहारदार कविता यावेळी सादर करण्यात आल्या.

राजेंद्र कोयटे व संतोष तांदळे यांनी खुमासदार सूत्रसंचलन करत, अधूनमधून मिश्किल किस्से, चारोळ्या यामुळे कवी संमेलन एका उंचीवर  नेले, यावेळी मा. नगराध्यक्ष कवी विजय वहाडणे मा. नगराध्यक्ष कवयित्री मा. ऐश्वर्यलक्ष्मी सातभाई कैलास साळगट,विधिज्ञ श्रद्धा जवाद, बाळासाहेब देवकर, बाल कवयित्री कु. रेवती संदीप चव्हाण, शैलजा रोहोम, हरीश चौधरी, संजय मंडलिक, सोमनाथ मंडाळकर, बलभीम उल्हारे आदी कवीनी  आपापल्या कविता सादर केल्या, नाट्यकलाकार गणेश सपकाळ,गणेश कानडे,संदीप चव्हाण,लॉ कॉलेजचे प्राचार्य, व अनेक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.कोपरगाव मधील नवोदित साहित्यिक, कवी यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा विद्यार्थी सहाय्यक समिती व  म. सा.प.यांचा  प्रयत्न असतो.मराठी भाषा, व अनेक विध साहित्य प्रकार यासाठी ही शाखा कोपरगाव मध्ये कार्य करत असते . जास्तीत जास्त युवकांनी मराठी भाषा जतन करून तिचा अभिजात पणा जपावा,  नवनवीन साहित्य लेखन करून दर्जेदारपणा वाढवावा असे संतोष तांदळे यांनी यावेळी सांगितले.

सर्व भाषाप्रेमी एकत्र आले तर मराठी भाषेचा जागर करणारे लवकरच  दोन दिवसीय  साहित्य संमेलन कोपरगाव मध्ये घेऊ, नवोदितांना भरपूर संधी देऊ असे यावेळी डॉ. हिरालाल महानुभाव यांनी सांगितले.

Pages