शिर्डी प्रतिनिधी - श्री साईबाबा आणि साईबाबा संस्थान यांच्या बद्दल अपमानजनक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत असल्याचा गंभीर आरोप करत शिर्डीचे ग्रामस्थ कमलाकर कोते यांनी अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी फिर्याद दाखल केली आहे. कमलाकर कोते व माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी शनिवार दिनांक 19 अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची भेट घेऊन या संदर्भातील तक्रार दाखल केली होते. यांनी या तक्रारीत म्हटले आहे की समाज माध्यमातील काही व्हिडिओमध्ये साईबाबा यांच्या बद्दल खोटी आणि अपमान जनक माहिती देण्यात आली आहे. यात साईबाबा यांचा जन्म आणि त्यांच्या जीवनाबद्दल चुकीच्या गोष्टी सांगितल्या जात आहेत तसेच साईबाबा संस्थान बद्दलही निराधार आरोप करण्यात आले आहेत. व्हिडिओमध्ये त्यांना विशिष्ट धर्माचे आहेत असे संबोधून अनेक बेछूट आरोप करण्यात आले आहेत. याशिवाय साईबाबा संस्थान बद्दलही अनेक निराधार आरोप करण्यात आले आहेत. साईबाबा व संस्थानचा अपप्रचार व बदनामी करणाऱ्या सर्व व्हिडिओची सखोल चौकशी करावी, व्हिडिओमध्ये अशी माहिती देणाऱ्या व पसरवणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरून हे व्हिडिओ काढून टाकावे, साईबाबांविषयीची निंदनीय पोस्ट करणाऱ्यावर तातडीने गुन्हे दाखल करावेत अशी मागणी कोते यांनी केली होते. यांनी या संदर्भात काही व्हिडिओंचा व व्यक्तींचा नामुलेखी केला आहे. यांनीही घेतली गंभीरतेने दखल साई संस्थांच्या अध्यक्षपदी न्यायाधीश आहेत. सीईओ पदी आयएएस अधिकारी तर सुरक्षा प्रमुख पदी पोलीस अधिकारी आहेत. त्यांनीही हे प्रकरण गंभीरतेने घेतले आहे संस्थांच्या वतीने ही लवकरच फिर्याद दाखल करण्याची शक्यता आहे.
Saturday, October 19, 2024

Home
Ahmednagar
news
साईबाबांचा संस्थान बद्दल अपमानजनक व्हिडिओ प्रसारित..... पोलीस अधीक्षकांकडे फिर्याद, गुन्हे दाखल करण्याची मागणी