कोपरगाव - रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज,
१७ व१८ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत रा.ब.नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर, येथे संपन्न झालेल्या अहमदनगर जिल्हा क्रीडा विभाग आंतरमहाविद्यालयीन मैदानी (Athletics)(मुले व मुली) स्पर्धेत महाविद्यालयातील या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ कामगिरी केली.
१. कु. आस्मा पठाण (T.Y.B.Sc)- हाफ मॅरेथॉन (२१ कि.मी धावणे) मध्ये प्रथम व सुवर्णपदक
२. कु. ओम चौधरी(T.Y.B.B.A) - लांब उडी मध्ये द्वितीय व रौप्य पदक
३. कु. वैष्णवी दरेकर(S.Y.BCS)- १०० मीटर हर्डल्स मध्ये द्वितीय व रौप्य पदक
४. कु. अलीशा निकाळे( *M.A. Geography-I) थाळी फेक मध्ये द्वितीय व रौप्यपदक, हातोडा फेक मध्ये तृतीय
व कांस्यपदक
५. ४× १०० रिले या सांघिक क्रीडा प्रकारात मुलींचा संघ द्वितीय क्रमांकावर त्यामध्ये कु. कोल्हे अंजली(F.Y.BSc),
कु.बनकर आस्था (S.Y.B.A), कु.गौरी कळसकर(F.Y.B.Com)
कु.वैष्णवी दरेकर(S.Y.BCS) या विद्यार्थीनींना रौप्यपदक मिळाले वरील विद्यार्थीनींची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे होणाऱ्या आंतर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्यांच्या या उत्कृष्ठ यश संपादन केल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ऍड. भगीरथ शिंदे साहेब यांनी सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनीही त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. स्पर्धकांना क्रीडा संचालक प्रा. डॉ. विशाल पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य, कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. बाबासाहेब शेंडगे कॉमर्स विभागाचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत सर्व विभाग प्रमुख, कार्यालय अधिक्षक श्री. सुनील गोसावी, सिनियर, ज्युनिअर व किमान कौशल्य विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी सर्व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन केले.