खर्च निरीक्षकांनी घेतला शिर्डी, कोपरगाव मतदारसंघातील खर्च विषयक कामकाजाचा आढावा - Shramik News

Breaking

Wednesday, October 23, 2024

खर्च निरीक्षकांनी घेतला शिर्डी, कोपरगाव मतदारसंघातील खर्च विषयक कामकाजाचा आढावा


 शिर्डी, दि.२३ :- भारत निवडणूक आयोगामार्फत अकोले, संगमनेर, शिर्डी व कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठी खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती झालेले देबशीष बिस्वास (आय.आर.एस) यांनी शिर्डी व कोपरगाव या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक खर्च विषयक कामकाजाचा आढावा घेतला. 


शिर्डी येथील भेटीप्रसंगी  निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल मोरे, गटविकास अधिकारी तथा नोडल अधिकारी जालिंदर पठारे तसेच खर्च पथकातील अधिकारी उपस्थित होते.


 कोपरगाव येथील भेटीप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत, सहायक खर्च निरीक्षक श्री.सरकार व तहसील कार्यालयातील खर्च नियंत्रण पथकातील अधिकारी उपस्थित होते.


खर्च निरीक्षकांनी यावेळी सर्व नोडल अधिकारी व खर्च व्यवस्थापनासंदर्भात उपस्थित इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक खर्च व्यवस्थापन वेळीच व योग्यप्रकारे करण्याच्या सूचना दिल्या. तसेच विधानसभा क्षेत्रनिहाय संवेदनशील भागाविषयी माहिती जाणून घेतली.


निवडणूकीत उमेदवारी दाखल करणाऱ्या सर्व उमेदवारांच्या खर्चावर नोडल अधिकारी तसेच सहाय्यक खर्च निरीक्षकांनी लक्ष ठेवून दैनंदिन अहवाल विहीत वेळेत सादर करावेत. या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्चाचे मूल्यमापन करण्यासाठी दर निश्चित करण्यात आले असून त्यानुसार उमेदवारांचा खर्च निश्चित करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.


खर्च निरीक्षकांचा मुक्काम संगमनेर येथे


देबशीष बिस्वास यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृह संगमनेर येथे असणार आहे. त्यांच्याशी ८९०२१९९९०० या मोबाईल  क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून अपर प्रवरा सब डिव्हीजनचे सहायक अभियंता प्रमोद माने  यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ८६५७५७७७७७, ८९७५२२४८१९ असा आहे. असे निवडणूक शाखेमार्फत कळविण्यात आले आहे.


Pages