कोपरगाव प्रतिनिधी - कोपरगाव विधानसभा मतदारसंघ असो की लोकसभा गेल्या 40 वर्षापासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या या कोपरगाव मतदार संघाने पाच वेळा खासदार चार वेळा आमदार दिला आहे.याचे एकमेव कारण म्हणजे नगर जिल्ह्यात सर्वात जास्त ठाकरेंच्या शिवसेनेचा ताकत कोपरगाव मतदारसंघात दिसून येते. येथील शिवसैनिकांनी शिवसेनेचा हा गड कायम राखला आहे. आज पर्यंत केवळ पक्षाला एक आमदार एक खासदार द्यायचा या निष्ठेने पेटून उठलेल्या शिवसैनिकांनी पक्षाने आयात केलेल्या आमदार व खासदाराला प्रामाणिकपणे मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. परंतु प्रत्येकाने आपली पोळी भाजून शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडून दिले हा इतिहास आहे. परंतु शिवसेनिकांनी कधी हार मानली नाही, आजही तो ताट मानेने आणि ताट कण्याने निवडणूक साठी उभा आहे. परंतु आज कोपरगाव मतदार संघात राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक बंद करायचे असेल तर शिवसेनेची मशाल पेटलीच पाहिजे. यंदाची विधानसभा निवडणुक काहीशी आगळे वेगळे ठरणारी असेल. या निवडणुकीत पहिल्यांदाच काही गोष्टी पाहायला मिळणार आहेत. राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर वेगळेच राजकीय समीकरण तयार झाले. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा एक भाजपसोबत सत्तेत आणि दुसरा गट काँग्रेस सोबत विरोधी पक्षात असल्याचे दिसून आले. त्यानंतर राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेच्या दुसऱ्या गटाला अनुक्रमे तूतारी आणि मशाल चिन्ह मिळाले. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र असलेल्या उद्धव ठाकरेंना पहिल्यांदाच मशाल हे नवीन चिन्ह मिळाले. नव्या चिन्हा सोबत लोकसभेला विजय मिळवून शिवसेनेने आपला गड कायम राखला आहे. लोकसभेच्या माध्यमातून अतिशय कठीण परिस्थितीमध्ये कमी वेळात येथील निष्ठावान शिवसैनिकांनी मशाल हे चिन्ह घराघरात पोहोचवले आहे. आता हेच मशाल चिन्ह घेऊन कोपरगाव विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना उमेदवारी मिळाली असली तरी दिग्दज असलेले कोल्हे यांच्या उमेदवारी वर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने त्यांनी शिवसेनेत येण्याची तयारी दाखवली होती. केवळ उद्धव साहेबांचे हात बळकट करण्यासाठी एक एक आमदार महत्त्वाचा ही गोष्ट लक्षात ठेवून शिवसैनिकांनी सुद्धा त्याला होकार दिला होता. परंतु राज्यासह केंद्रीय भाजपाच्या नेत्यांना कोल्हे यांना बंडखोरी करण्यापासून भाजपमध्येच थांबविण्यात यश आले. दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली ती त्यांच्या विरोधात मशाल पेटणार त्याची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा सह संपर्कप्रमुख एकनिष्ठ शिवसैनिक राजेंद्र झावरे यांच्या नावावर सर्व मते शिक्कामोर्तब झाले आहे. केवळ औपचारिकता म्हणून मातोश्रीच्या आदेशाची अर्थात एबी फॉर्मची ते वाट पाहत असल्याचे समजते. एकंदरत या विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुक ही रंगतदार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.धन शक्तीच्या पुढे जनशक्ती मशालच्या रूपाने विजयी होईल अशीही मतदार संघात चर्चा सुरू आहे.
Thursday, October 24, 2024

Home
Ahmednagar
kopargaon
Maharashtra
news
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक थांबवण्यासाठी तुतरीच्या आवजपेक्षा मशालीचा भडका गरजेचा राजेंद्र झावरे यांना उमेदवारी महाविकास आघाडीने दिल्यास कोपरगाव इतिहास घडणार .
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक थांबवण्यासाठी तुतरीच्या आवजपेक्षा मशालीचा भडका गरजेचा राजेंद्र झावरे यांना उमेदवारी महाविकास आघाडीने दिल्यास कोपरगाव इतिहास घडणार .
Tags
# Ahmednagar
# kopargaon
# Maharashtra
# news
Share This
About Shramik
news
Tags
Ahmednagar,
kopargaon,
Maharashtra,
news