कोपरगाव विधानसभेसाठी २७ जणांनी घेतले ३९ अर्ज - Shramik News

Breaking

Tuesday, October 22, 2024

कोपरगाव विधानसभेसाठी २७ जणांनी घेतले ३९ अर्ज


 कोपरगाव(तालुका प्रतिनिधी)- कोपरगाव विधानसभा निवडणुकीत अर्ज भरण्यासाठीच्या पहिल्या दिवशी २७ जणांनी ३९ उमेदवारी अर्ज विकत घेतले.

कोपरगाव तहसील कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके, सहायक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकारण्याची प्रक्रिया मंगळवारी सुरू झाली.


आज पहिल्या दिवशी २७ जणांनी ३९ उमेदवारी अर्ज घेतले आहे. यात संजय भास्करराव काळे, आशुतोष अशोकराव काळे, प्रभाकर अहिरे, किरण चांदगुडे, बाबूराव पवार, दिलीप गायकवाड, विजय सुभाष भगत, विजय सुधाकर जाधव, राजेंद्र माधवराव कोल्हे, प्रफुल्ल शिंगाडे, किसन सोनवणे, शिवाजी कवडे, विजय वडांगळे, दत्तू भाटे, शरद ससाणे, दिलीप लासुरे, उत्तमराव चरमळ, प्रमोद लबडे, शिवाजी ठाकरे, महेश नवलपुरे, चंद्रहास औताडे, गौतम बनसोडे, संजय शिंदे, विश्वनाथ वाघ, आकाश काळे, नवनाथ वाघ यांचा समावेश आहे.

Pages