राष्ट्रीय महिला आयोगाला मिळाल्या पहिल्या मराठी अध्यक्षा विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड - Shramik News

Breaking

Saturday, October 19, 2024

राष्ट्रीय महिला आयोगाला मिळाल्या पहिल्या मराठी अध्यक्षा विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड


मुंबई -  भाजपच्या राष्ट्रीय सचिव, राजस्थानच्या सहप्रभारी विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.

▪️राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या आहेत.

▪️त्यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही काम पाहिले आहे.

▪️त्यांनी "सक्षमा", "प्रज्ज्वला", "सुहिता" यांसारखे महिला केंद्रित कितीतरी उपक्रम राबवले आहेत.

▪️जयंती पटनायक या राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा होत्या.

राष्ट्रीय महिला आयोग :

▪️भारत सरकारची वैधानिक संस्था

▪️1992 मध्ये विशेष कायद्यान्वये स्थापन झालेल्या या आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार

▪️राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षाला केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा असतो.

Pages