आ. आशुतोष काळेंनी केले उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवारांच्या गाडीचे सारथ्य - Shramik News

Breaking

Friday, November 15, 2024

आ. आशुतोष काळेंनी केले उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवारांच्या गाडीचे सारथ्य


 

कोळपेवाडी वार्ताहर :- विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आ.आशुतोष काळेंच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेसाठी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार हे गुरुवार (दि.१४) रोजी कोपरगाव येथे आले होते. एस.एस.जी. एम.कॉलेजच्या मैदानावर तयार करण्यात आलेल्या हेलीपॅडवर त्यांच्या हेलिकॉप्टरचे लँडिंग होवून त्यांनी हेलिकॉप्टरमधून मधून उतरताच गाडीत बसून येसगावच्या दिशेने कोल्हे वस्तीकडे प्रयाण करून कोल्हे परिवाराची सदिच्छा भेट घेतली यावेळी या प्रवासादरम्यान आ.आशुतोष काळे यांनी स्वत: त्यांच्या गाडीचे सारथ्य केले.

राज्यात भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजितदादा पवार गट) व मित्र पक्षांचे महायुती सरकार असून आ.आशुतोष काळे राष्ट्रवादी व कोल्हे भाजपात आहेत.तीनही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयानुसार कोपरगावची जागा राष्ट्रवादीला सुटली असून आ.आशुतोष काळे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत.राज्यात महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून यावे यासाठी सर्वच महायुतीचे नेते आपापल्या पक्षाबरोबरच युतीच्या पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना प्रचारात सक्रीय करीत आहे.

त्याच धर्तीवर उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी सभेपूर्वी हेलीपॅडवरून थेट कोल्हे वस्ती गाठली. यावेळी त्यांच्या समवेत आ.आशुतोष काळे हे देखील होते. कोल्हे परिवाराकडून उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी एक दिवस आगोदर आ.आशुतोष काळे यांनी देखील कोल्हे वस्तीवर जावून सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपिनराव कोल्हे व मा.आ.स्नेहलता कोल्हे यांची भेट घेवून त्यांचे आशीर्वाद घेतले होते. तसेच काही दिवसांपूर्वी राज्याचे ग्रामविकासमंत्री ना.गिरीश महाजन यांनी देखील कोल्हे परिवाराची भेट घेवून कोपरगावात महायुती भक्कम असून आम्ही सर्व एक होवून लढणार असल्याचे सांगितले होते व उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, आ.आशुतोष काळे यांनी कोल्हे परिवाराची भेट घेतल्यानंतर शिवसेना (शिंदे गट) व भाजपा कोल्हे गटाचे कार्यकर्ते देखील उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या सभेला मोठ्या संख्येने हजर होते. रेकॉर्डब्रेक गर्दीच्या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने लावलेली उपस्थितीने उत्साहीपूर्ण वातावरणात पार पडलेल्या सभेने कोपरगाव मतदार संघाचा संपूर्ण माहोलच बदलून गेला आहे.  

Pages