कोपरगाव सौ.सविता विधाते दिनांक 23 नोव्हेंबर 2024 - कोपरगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार आशुतोष काळे यांचा दुसऱ्यांदा दणदणीत विजय झाला असून ते तब्बल एक लाख 24 हजार 624 इतक्या मोठ्या मताधिक्याने विजय झाले आहेत. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या कार्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले आहे.
सर्व जाती धर्म पंथ गट तट या सर्वांनी त्यांना भरघोस असे मतदान दिले आहेत. महाराष्ट्रातील दिग्दज विजयापैकी एक विजय म्हणजे आमदार आशुतोष काळे यांचा आहे.माननीय अजित दादा पवार यांनी जो शब्द दिला होता की जितके जास्त मताधिक्य, तितका जास्त निधी आणि तेवढीच मोठी जबाबदारी.
आता तालुक्याला प्रतीक्षाही आहे ही कोणती मोठी जबाबदारी आमदार आशुतोष काळे यांना मिळणार आहे?सर्वांचे लक्ष या जबाबदारीकडे लागून राहिलेले आहे.