जि.प.प्रा.शा. देवकर वस्ती (टाकळी) येथे मंगळवार २६ रोजी उत्साहात संविधान दिन साजरा करण्यात आला.विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
मुख्याध्यापक श्री खरात सर यांनी प्रत्यक्ष संविधानाची प्रत विकत आणून प्रत्येक विद्यार्थ्याला हाताळायला लावली.विद्यार्थ्यांनीही उत्सुकतेने त्यातील चित्र व माहितीचे अवलोकन केले.विद्यार्थ्यांना राज्यघटनेचे महत्त्व,उपयुक्ततेसंदर्भातील माहिती दिली. यावेळी अनेक विद्यार्थी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थांना प्रोत्साहन देण्यासाठी व यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षकांनी पुढाकार घेतला.